आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशयितासह सराफालाही कोठडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जोड भावीपेठेतील नरेश मुद्दा यांच्या घरात नऊ फेब्रुवारी रोजी चोरी झाली होती. याप्रकरणात एका संशयिताला आणि चोरीचे दागिने घेतल्याप्रकरणी सराफाला मंगळवारी न्यायालयात हजर केल्यानंतर एक दिवस पोलिस कोठडी मिळाली. सोमवारी दोघांना अटक झाली होती. सराफ सचिन सिद्राम मुलगे, संशयित चोर दादापीर मौलाली शेख (वय २०, रा. गोदूताई नवीन विडी घरकुल) या दोघांना अटक झाली होती. मुद्दा यांनी जोडभावी पोलिसात फिर्याद दिली होती. सोन्याचे गंठण, अर्धा तोळे अंगठी असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. मुद्दा यांच्या घरात झालेली चोरी सीसीटीव्हीत कैद झाली होती. त्यावरून तपास सुरू होता. शेख याला अटक केल्यानंतर त्याने चोरलेले दागिने सराफ व्यापारी मुलगे यांना विकल्याचे सांगितले होते.
तीसलाख कोर्टात जमा करा; व्हॅल्युएटर कुलकर्णी यांना जामीन इंडियन बँकेचे व्हॅल्युएटर विजयकुमार कुलकर्णी यांना मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीकांत भोसले यांनी जामीन दिला. मात्र, त्यांना तीस लाख रुपये न्यायालयात अनामत म्हणून जमा करण्याचे आदेश आहेत.
कुलकर्णी हे दागिने गहाण ठेवताना ग्राहकांना सोबत घेऊन बनावट दागिने ठेवण्यास सांगितले. पैसे घेतल्यानंतर ग्राहक आणि कुलकर्णी मिळून पैसे वाटून घेत होते. असा फसवणुकीचा आकडा एक कोटी ६७ लाखांपर्यंत गेला होता. सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक झाली होती. अड. मिलिंद थोबडे, अॅड. विनोद सूर्यवंशी यांच्यामार्फत त्यांनी जामिनासाठी अर्ज दिला होता. त्यानुसार दोन लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला आणि तीस लाख रुपये अनामत जमा करण्याचे आदेश आहेत.

तीनलाख पळवून नेल्याप्रकरणी टेम्पोचालकासह चौघांवर गुन्हा
हैदराबादयेथे बोकड विक्री करून तीन लाख रुपये आणताना तिघांनी मिळून पैसे पळवून नेले होते. यात टेम्पोचालकाचा समावेश असल्यामुळे त्याच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. राम वाघमारे (रा. चडचण, इंडी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मुज्जफर खाटीक (रा. मंगळवेढा) यांनी सोलापूर तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना १४ मार्च रोजी बावी पेट्रोल पंपाजवळ घडली होती. आज फिर्याद देण्यात आली आहे. खाटीक यांच्याकडे राम वाघमारे हा गाडीवर चालक होता. ते टेम्पोतून बोकड विकून सोलापूरकडे येत होते. पेट्रोल पंपाजवळ आल्यानंतर इंडिका कार आडवी लावून टेम्पो थांबविला. चाकूचा धाक दाखवून पैसे पळवले. यात चालकाचा समावेश असल्यामुळे गुन्हा दाखल झाला आहे.