आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरपूरमध्‍ये सराफाचा खून करून लुटले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर - कासेगाव (ता. पंढरपूर) येथील सराफाचा खून करून त्याच्याकडील सुमारे 5 लाख 70 हजारांचा ऐवज लुटून नेल्याप्रकरणी तीनजणांना तालुका पोलिसांनी अटक केली आहे. समाधान माने, तानाजी हरी पवार व आसिफ उर्फ बबलू हुसेन शेख (सर्वजण रा. कासेगाव, ता. पंढरपूर) अशी अटकेतील संशयित आरोपींची नावे आहेत. ही घटना 2 एप्रिल रोजी कासेगाव हद्दीत घडली होती. याप्रकरणी सुजय उदयसिंह घाटगे (नातेपुते पोलिस ठाणे) यांनी फिर्याद दिली होती.


येथील सुभाष रमेश दीक्षित (वय 32) यांचे कासेगाव (ता. पंढरपूर) येथे सराफी दुकान आहे. घटनेदिवशी संध्याकाळी साडेसात ते रात्री साडेदहाच्या दरम्यान कासेगाव हद्दीत संशयित आरोपी माने, पवार व शेख या तिघांनी दीक्षित यांना त्यांच्याच कारमध्ये (एम.एच.13, ए.सी.9352) मध्ये बसवून लाल रंगाच्या स्कार्फने गळा आवळून त्यांचा खून केला. त्यांच्याकडील 45 हजार रुपये किमतीचे 150 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, पाच लाख रुपये किमतीचे 10 किलो चांदीचे दागिने व 20 ते 25 हजारांची रोकड असा सुमारे सहा लाखांचा ऐवज लुटून नेला. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी दीक्षित यांचा मृतदेह गाडीसह नातेपुते (ता. माळशिरस) येथील नीरा उजव्या कालव्यात टाकून दिला होता.