आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रभागेवर झुलता पूल; तत्त्वत: मंजूरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत श्रीक्षेत्र पंढरपूरचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होणार आहे. आषाढी, कार्तिकी यात्रा कालावधीत मंदिर परिसर व वाळवंटातील वारकर्‍यांची गर्दी कमी व्हावी आणि अधिकाधिक वारकर्‍यांना दश्रन सुलभ होण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी चंद्रभागा तीरावर झुलता पूल व स्कायवॉकची संकल्पना सुचविली आणि त्याला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तत्त्वत: मंजुरीही दिली आहे. यासाठी तीर्थक्षेत्र आराखड्यामध्ये अतिरिक्त 300 कोटी रुपयांची वाढ करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनीही जाहीर केले होते.

गुरुवारी विभागीय आयुक्तांकडे तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासंबंधी बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासाबाबतचा आराखडा सादर केला. यामध्ये वारकर्‍यांसाठी करण्यात येणारा अत्याधुनिक पूल, स्कायवॉक, घाटाचे सुशोभीकरण आदी कामांसह इतर सोयी-सुविधांची माहिती दिली. गोपाळपूर येथे बंधारा बांधण्यात येणार असून यासाठी 8 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. कडा विभागाकडे तांत्रिक मान्यतेसाठी प्रस्ताव आहे. बंधार्‍यामुळे वाळवंट पाण्यात बुडणार नाही , असे गेडाम यांनी सांगितले.
रेल्वेच्या जमिनीचे सांपादन पंढरपूर येथे वारकर्‍यांसाठी प्रशस्त असे भक्तनिवास बांधण्यात येणार आहे. शिवाय इतर सुविधाही उपलब्ध करून देण्यासाठी 65 एकर जागा उपलब्ध आहे. यापैकी 15 एकर जागा रेल्वेची असून ही जागा लवकरच ताब्यात घेण्यात असल्याचे जिल्हाधिकारी गेडाम म्हणाले.

वारकर्‍यांशी होणार चर्चा झुलता पूल, स्कायवॉक, दश्रनमंडप, विष्णुपद आणि गोपाळपूर येथील बंधारा यासंबंधी वारकर्‍यांशी चर्चा करण्यात येणार आहे. यासंबंधी त्यांचे मते जाणून घेऊन यासंबंधीचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी सांगितले.
पंढरपुरातील चंदभागेच्या घाटाचे आणि चंद्रभागा नदीवर साकारल्या जाणार्‍या झुलत्या पुलाचे प्रकल्पचित्र
मुख्यमंत्र्यांनी दिली मंजुरी
श्रीक्षेत्र पंढरपूर विकासांतर्गत अत्याधुनिक पूल, स्कायवॉक, घाटाचे सुशोभीकरण, विष्णुपद सुशोभीकरण करण्यात येणार आहे. यासाठी अंदाजे 168 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. याला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तत्त्वत: मंजुरी दिली आहे. डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी.

असा असणार झुलता पूल..
चंद्रभागेच्या दोन्ही काठावर पुलासाठी पुंडलिक मंदिर, विठ्ठल मंदिराला धक्का न लावता पिलर उभारले जातील. पूल संपल्यानंतर थेट मंदिरात 300 मीटर अंतराचे स्कायवॉक असेल. नदीपात्रापलीकडे एक दश्रनमंडप राहील. साधारणत: नदीपलीकडील भागाकडून मुख व पददश्रन घेणार्‍या भाविकांसाठी हा पूल उपयोगी पडेल.दश्रनासाठी प्रदक्षिणा मार्ग व वाळवंटात होणारी गर्दी कमी करण्यास हा पूल फायदेशीर ठरेल. यासाठी अंदाजे 70 कोटी रुपये खर्च होणार आहेत.

घाट आणि विष्णुपदाचे पालटणार रूपडे..
जुना दगडी पूल ते गोपाळपूरपर्यंतच्या घाटाचे सुशोभीकरण केले जाईल. दगडी पूल ते पुंडलिक मंदिरापर्यंतचा खर्च मंदिर समिती व शासन करेल तर पुंडलिक मंदिर ते गोपाळपूरपर्यंतचा खर्च इस्कॉन करेल. विष्णुपद मंदिराच्या सुशोभीकरणासाठी भरीव तरतूद करण्यात येणार आहे. विष्णुपद आणि घाटाच्या सुशोभीकरणाला अंदाजे 49 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.