आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागेवर पन्नासजणांना नोकरी; सातशेजणांची झाली निवड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जाई-जुईमंचतर्फे झालेल्या र्जाब फेअरमध्ये जागेवर ५० जणांची नोकरी पक्की झाली. येथील नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर दोन दिवसांपासून मेळावा सुरू होता. त्याचा समारोप रविवारी झाला.

सुमारे ७०० उमेदवारांना कंपन्यांकडून आठवडाभरात निवडीचे पत्र पाठवून बोलावण्यात येणार आहे. जिल्ह्यातील एकूण ७५० जणांना या मेळाव्यात रोजगार मिळाला आहे.
सोलापुरातील सुमारे २० कंपन्यांनी यात भाग घेतला. त्यात आयएलएफसी, एमईपी, प्रिसिजन, रुद्राली हायटेक, लक्ष्मी हायड्रोलिक, क्रॉस, जामश्री मिल्स, आयपींग, चव्हाण उद्योग, बालाजी अमाईन्स, बालाजी सरोसर, अविनाश भोसले इन्फ्रा, नट्स, सोलापूर जिल्हा यंत्रमाग संघ, शॉपर्स स्टॉप, एनआयटी, एससीएल सर्व्हिस, रिलायन्स आदींचा समावेश होता.
पाच हजार ते चाळीस हजार पगार
सहभागी कंपन्यांत हजार जागा रिक्त होत्या. या उमेदवारांना पाच हजार ते ४० हजारापर्यंत पगार असू शकतो.” संदीपदेसाई, डायरेक्टर,एनआयआयटी
भरलेली पदे
व्यवस्थापकते मदतनीस अशा सर्व संवर्गातील पदांसाठी मुलाखती झाल्या. प्रामुख्याने हेल्पर, ऑफिस बॉय, मेन्टेनन्स मॅनेजमेंट, फौऊंड्री मॅनेजमेंट, सेल मॅनेजमेंट, कस्टमरकेअर एक्जीकेटीव्ह, कॉल सेंटरब, टेक्निकल सपोर्ट, शोरुम एक्जीकेटीव्ह, इल्क्ट्रीशियन, वेल्डर, फिटर आदी अनेक पदे भरण्यात आली.
रिक्त पदे हजार, उमेदवार चार हजार, निवड साडेसातशेची
दोनिदवसात सुमारे चार हजार उमेदवारांनी मुलाखती दिल्या. यापैकी ७५० जणांची निवड करण्यात आली. या उमेदवारांना येत्या आठवडाभरात निवडीचे पत्र देऊन बोलावण्यात येणार आहे. ५० उमेदवारांना जॉब फेअरमध्ये निवडीचे पत्र थेट देण्यात आले आणि तत्काळ कामाला सुरुवात करण्याच्या सूचना देण्यात आल्या.