आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्रकार संघाचे पुरस्कार आज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - पत्रमहर्षी रंगअण्णा वैद्य स्मृती पुरस्कार (राज्यस्तरीय) व बाबूराव जक्कल स्मृती पुरस्कार (जिल्हास्तरीय)चे वितरण शनिवारी सकाळी दहाला अँम्फी थिएटर येथे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती भीमराव नाईक असतील. वैद्य पुरस्कार ‘दिव्य मराठी’चे मुख्य संपादक कुमार केतकर यांना जाहीर झाला आहे. 25 हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह असे स्वरूप आहे. जक्कल पुरस्कार लोकसत्ताचे सोलापूर प्रतिनिधी एजाजहुसेन मुजावर यांना देण्यात येत आहे. स्मृतीचिन्ह व 15 हजार रूपये रोख असे त्याचे स्वरूप आहे.