आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Joy Fo Giving In Solapur Bye Divyamarathi Project

‘दिव्य मराठी’कडे जमा झालेले धान्य वितरित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- ‘दै. दिव्य मराठी’ने 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत (जॉय ऑफ गिव्हिंग) ‘देण्याचे सुख’ या अभियानात सोलापूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. सहा दिवसांत 1 हजार 667 किलो धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे दान सोलापूरकरांनी दिले. ‘देण्याचे सुख’ अद्वितीय आणि अविस्मरणीय असल्याचा अनुभव सोलापूरकरांनी या निमित्ताने घेतला.

संकलित झालेले धान्य बुधवारी भारतमाता आदिवासी प्रतिष्ठानचे ज्ञानेश्वर भोसले (मोहोळ) यांच्याकडे 450 किलो धान्य व मुलांसाठी 70 शर्ट देण्यात आले. मुळेगाव येथील पारधी समाजातील विद्यार्थ्यांच्या आर्शमासाठी परमेश्वर काळे यांच्याकडे 250 किलो धान्य सुपूर्द करण्यात आले. वाचकांच्या दातृत्वाबद्दल भोसले व काळे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

धान्य जमा करून या दात्यांनी अनुभवले देण्याचे सुख
अनुराधा अनंत वळसंगकर, दिलीप अभ्यंकर, आशा देशपांडे, र्शद्धा अध्यापक , कमल बायस, किरण कटकधोंड, हेमा गोयल, सुवर्णा साबळे, एम. एम. काझी, मलकारसिध्द हैनाळकर, शिवाजी सिंदगी, उमादेवी अभंगराव, प्रकाश भोसले, सुशांत बेले, धनर्शी बेले, एम.जी. अडगळ, विनोद काटवे, कृतिका टोळे, मल्लिकार्जुन राजमान्य, रमेश मीठ्ठापल्ली, शशिकला हुगर, उमेश लोखंडे, धनंजय रमेश पवार, युवराज पवार, जोत्स्ना कुलकर्णी, श्वेता पात्रुडकर, र्शवण पोरे, अप्पा रेणके, शशिकांत गायकवाड, अल्ताफ खरादी, संताजी डी. एम., शंतनु शहा, रूपाली लड्डा, मदन दोड्डीमनी, विद्या विनायक कुलकर्णी, संजय बुबणे, नागराज उपासे, अरुण गायकवाड, भारती गायकवाड.
भारतमाता आदिवासी प्रतिष्ठान, मुळेगाव आर्शम शाळेला 700 किलो धान्य वाटप करण्यात आले.