आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ज्येष्ठांनी मृत्यूपत्र करणे गरजेचे, जिल्हा न्यायाधीश देवरे यांनी दिले धडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- आपल्या पश्चात संपत्तीच्या बाबतीत कोणतेही वाद टाळण्यासाठी संपत्तीची योग्य ती व्यवस्था लावून देण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी मृत्यूपत्र करणे गरजेचे असल्याचे मत मुख्य जिल्हा न्यायाधीश अश्विनीकुमार देवरे यांनी व्यक्त केले. साक्षेप ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजिण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठांसाठीचे कायदे मार्गदर्शन हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.
विजापूर रोडवरील कुमारस्वामीजी योग विहार येथे शनिवारी सायंकाळी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी न्या. देवरे यांनी आपल्या सहज ओघवत्या शैलीत ज्येष्ठांशी हितगूज साधत त्यांना कायद्याची ओळख करून दिली. मृत्यूपत्राविषयी माहिती देताना ते म्हणाले, मृत्यूपत्राचे रजिस्टर करणे गरजेचे नाही. साध्या कागदावर देखील मृत्यूपत्र करता येते. त्यासाठी केवळ दोन साक्षीदारांची गरज आहे. शिवाय यासाठी डॉक्टरांच्या प्रमाणपत्राची गरज भासत नसल्याचे त्यांनी सांगितले. ज्येष्ठ नागरिकांनी जास्तीत जास्त काळ आनंदात घालवावा. अधिकाधिक मित्र जोडावेत. अापल्या आवडीची गाणी ऐकावीत. पुस्तके वाचावीत. लोकसंपर्क वाढवावा. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर साक्षेप ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ. राजाभाऊ ढेपे, सचिव चंद्रकांत रेळेकर, डॉ. मनोहर चव्हाण उपस्थित होते. व्याख्यानास ज्येेष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
ब्रिटिशांचे कायदे कठोर
इंग्रजांच्याकाळात कायदे काटेकोरपणे पाळले जात होते. त्या तुलनेत आता कायदे पाळले जाताना दिसत नाही. त्यामुळे त्रुटी राहतात. याचा परिणाम न्याय दानावर होतो. न्याय दान उशिरा होते अथवा गुन्हेगार निर्दोष सुटण्यास मदत होते. अलीकडे न्यायाधीशांच्या नेमणुकीत देखील बदल झालेला पाहावयास मिळतो. पूर्वी न्यायाधीश होताना त्यांना वकिलीचा किमान ते १० वर्षांचा अनुभव असणे गरजेचे मानले जात होते. आता मात्र कायद्याची पदवी घेतल्यानंतर लगेच न्यायाधीश होत आहे.
भारतात ३६ हजार कायदे
भारतातजवळपास वेगवेगळ्या प्रकारचे ३६ हजार कायदे आहेत. त्यापैकी वकिलांना केवळ २० कायद्याचे ज्ञान शिकविले जाते. त्यामुळे वकिलांचे ज्ञान देखील अपूर्ण असते. उपलब्ध ज्ञानाच्या आधारावरच त्यांना केस लढवावी लागते.
बातम्या आणखी आहेत...