आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुळे सोलापूरमधील 38 लाखांच्या रस्त्याची तीन महिन्यांतच लागली वाट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - जुळे सोलापूर पाण्याची टाकी ते बॉम्बे पार्क दरम्यान 1200 मीटर रस्ता करण्यात आलेला आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. महापालिकेचे अधिकारी रस्त्याचे दोन लेअर राहिले असल्याचे सांगून लंगडे सर्मथन करत आहेत. पावसाळय़ाच्या पहिल्या सत्रातच नव्या रस्त्याचे खड्डे दुरुस्त करावे लागतील. अन्यथा 38 लाख रुपये पुढील पावसात वाहून जातील. या खड्डय़ांमुळे रस्त्याच्या दर्जाचा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. रस्त्याचे काम पूर्ण होण्यापूर्वीच खड्डे पडले असतील तर रस्ता बांधणीच्या दर्जाचा प्रश्न निर्माण होतो. दीड महिन्यापूर्वी केलेल्या रस्त्याला चढावर तीन खड्डे पडले आहेत. सखल भागात चार खड्डे व इतर ठिकाणी मिळून किमान 17 ठिकाणी खड्डे पडले आहेत. पावसाळा संपेपर्यंत या रस्त्याची अवस्था काय होईल असा प्रश्न आहे. पावसाळय़ापूर्वी रस्ता पूर्ण करणे टेंडरनुसार अपेक्षित होते. मनपाने मक्तेदाराच्या कामाचे सर्मथन करत डांबरमिर्शित खडीचा लेअर टाकण्याचे काम बाकी असल्याचे सांगितले आहे. परंतु नवीन गाडी घ्यायची आणि दुसर्‍या दिवसापासून दुरुस्ती करायची असा प्रकार दिसत आहे.


धाक नाही
ठेकेदारांवर कोणात्याही यंत्रेणेचा धाक नाही. त्यामुळे रस्त्यांच्या दर्जाबाबत ते बेफिकिर आहेत. नवीन आयुक्तांनी लक्ष द्यावे’’ नितीन गोवर्धन, नागरिक

गुणवत्ता तपासा
त्या रस्त्यावर मुरूम टाकला नाही. रस्त्याच्या दर्जाबाबत मला फारशी माहिती नाही पण आता रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्याची गुणवत्ता तपासा.’’ नागेश ताकमोगे, नगरसेवक

खड्डे पडले
काम सुरू असताना पुरेशी खडी टाकली नाही आणि डांबर वापरले नसल्याने खड्डे पडले आहेत. रस्त्यांचा दर्जा काय, आम्हाला समजत नाही पण खड्डे पडले. याचा अर्थ रस्ता बांधणी दर्जा सुमार आहे.’’ चंद्रकांत दिवाकर, नागरिक

ते काम अपूर्ण
जुळे सोलापूर पाण्याची टाकी ते बॉम्बे पार्क दरम्यान असलेल्या रस्ता अर्धवट आहे. पावसाळ्यानंतर त्यावर पुन्हा दोन लेअर येतील. आता पडलेले खड्डे पुन्हा बुजवण्यात येणार आहेत. अंतिम कामानंतर या रस्त्यावर एकही खड्डा पडणार नाही, याची दक्षता घेऊ.’’ संदीप कारंजे, उपअभियंता, मनपा रस्ते विभाग

रस्त्याच्या दर्जाची खात्री होत नाही
ग्रेडेशन फोरची खात्री होत नाही, ही तांत्रिक माहिती आम्ही रस्ता ऑडिट रिपोर्टमध्ये महापालिकेला दिली आहे. आम्ही काम सुरू असताना खडी आणि डांबराचे नमुने घेतले व त्याचा अहवाल दिला. रस्त्याच्या दर्जाबाबत 100 टक्के खात्री आम्ही देऊ शकत नाही. आमच्या तपासणीच्या वेळी टाकलेल्या मालाची तपासणी करतो. रस्त्यावर खड्डा पडू नये याची काळजी रस्ता तयार करताना घेणे गरजेचे आहे.’’ महेंद्र बनसोडे, अभियंता, मनपानियुक्त गुणवत्ता नियंत्रण संस्था

रस्त्यावर इथे पडलेत खड्डे
पाण्याच्या टाकीजवळ वळण, बालाजी मंगल कार्यालयाच्या पुढे, पद्मजा पार्क पुढे, उजनी बँक कॉलनी, रूबी नगर बस स्टॉप समोर, रूबी नगर, खुनेच्या घरासमोर, विष्णू पार्क समोर जाणारा रस्ता, नाथ प्लाझा, बॉम्बे पार्क गेट (याशिवाय किरकोळ खड्डे).

रस्ता टेंडरमधील उहापोह

29 डिसेंबर 2012 ते एप्रिल 2013 : वर्क ऑर्डर

37.97 लाख रस्त्यासाठी खर्च मंजूर

19 लाख मनपाकडून अदा रक्कम

1200 मीटर रस्त्याची लांबी