आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

200 बस खरेदी- फक्त पाच मिनिटांत मंजुरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- 200 बस खरेदीच्या विषयाला शुक्रवारी परिवहनच्या सभेत अवघ्या पाच मिनिटांत मंजुरी मिळाली. 111 कोटी रुपये खर्चास सभागृहाने एकमताने मान्यता दिली. परंतु देखभाल दुरुस्तीसाठी 64 कोटी रुपयांच्या अवास्तव तरतुदीवरील सत्ताधार्‍यांसह विरोधकांचा आक्षेप कायम राहिला. त्यामुळे देखभालीचा विषय अजेंड्यावरून वगळण्यात आला.
महापालिका परिवहन समितीची सभा शुक्रवारी सकाळी 11.30 वाजता स्थायी समिती सभागृहात सभापती सुभाष चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. 111 कोटी सहा लाख 40 हजार रुपये किमतीच्या 200 बस खरेदीचा विषय अजेंड्यावर होता. त्यास विरोधी पक्षाने अनुमती दिल्याने एकमताने विषय पाच मिनिटांत मंजूर झाला. सभेत बस खरेदीला मंजुरी मिळताच बस पुरवठय़ाचे मागणीपत्र व्हॉल्वो कंपनीस दिल्याचे मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी सांगितले.
बीएस फोरची बस
भुरेलाल कमिटीच्या अहवालानुसार, प्रदूषणचे प्रमाण पाहता बीएस फोरच्या बसची शहरात आवश्यकता आहे. अशा प्रकारच्या बस देशात कुठेही नाहीत. पण सोलापूरसाठी त्याची वेगळी निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे प्रती बस 3.5 लाख रुपये अतिरिक्त असे सात कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. केंद्र सरकारने बीएस थ्रीची पूर्वी मंजुरी दिली होती. त्यानंतर पाठपुरावा करून बीएस फोर बससाठी अधिकच्या सात कोटी रुपयांना केंद्राकडून मंजुरी घेतली.
बसचे प्रकार व किमती
अशोक लेलँडची मोठी बस (किंमत 55.60 लाख) : 145 बस : एकूण किंमत 80.62 कोटी
अशोक लेलँडची मिनी बस ( किंमत 29.12 लाख) : 35 बस : एकूण किंमत 10.19 कोटी
व्हॉल्वो बस (किंमत 1.06 कोटी) : 20 बस : एकूण किंमत 20.25 कोटी
एकूण 200 बस : 111 कोटी 6 लाख 40 हजार रुपये
महापालिकेला 11 कोटी मोजावे लागणार
200 बस खरेदीसाठी केंद्र व राज्य सरकारकडून 111 कोटी रुपये मिळणार आहेत. यात केंद्र 80 टक्के तर, दहा टक्के रक्कम राज्य सरकार देणार आहे. त्यापैकी 38.78 कोटींचा पहिला हप्ता केंद्राकडून महिनाअखेरपर्यंत मिळेल. बसच्या खरेदीसाठी व्हॅट, एलबीटी, विमा व इतर खर्च मिळून पालिकेला 14.10 कोटी मोजावे लागणार आहेत. त्यापैकी 3.10 कोटी एलबीटीचे असल्याने ते मनपा तिजोरीत जमा होतील.
4200 बस खरेदी विषयाला परिवहन समितीने एकमताने मंजुरी मिळाली. समितीतील काही सदस्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे समाधान झाल्याने एकमताने मान्यता दिली. खरेदी खर्चास मान्यता दिली असली तरी देखभाल दुरुस्तीच्या विषयाला मान्यता दिलेली नाही. यावर नंतर चर्चा होणार आहे. सुभाष चव्हाण,
परिवहन समिती सदस्य
बसच्या देखभाल दुरुस्ती खर्चावर टाटा कंपनी तडजोड करण्यास तयार नाही. किंमत कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. तो विषय नंतर परिवहन समितीकडे पाठवण्यात येणार आहे. दुबई आणि सिंगापूरच्या धर्तीवर सोलापुरात सिटी बस येतील. व्हॉल्वो कंपनीच्या पाच वातानुकूलित बस एप्रिलमध्ये धावतील. चंद्रकांत गुडेवार, मनपा आयुक्त