आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामगार नेत्यांचा आधारवड गेला- नरसय्या आडम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीचे सदस्य के. एल. बजाज यांच्या जाण्याने कामगार नेत्यांचा आधारवड कोसळल्याची भावना येथील नेत्यांनी व्यक्त केली.बजाज यांनी सोलापुरात अनेक सभा गाजवल्या. सोलापूरचे प्रभारी म्हणून काम पाहिले. त्यांच्या जाण्याने कामगार चळवळीचे नुकसान झाले, असे ‘सीटू’चे प्रदेशाध्यक्ष नरसय्या आडम म्हणाले.
बजाज यांना अखेरचा लाल सलाम देण्यासाठी ते शुक्रवारी रात्री मुंबईला रवाना झाले. पक्षाच्या माध्यमातून बजाज यांनी शेतकरी, कामगार, मजूर महिला आणि विद्यार्थ्यांना घडवले. त्यांचे प्रबोधन केले. सामान्यांच्या न्याय्य- हक्कांसाठी शेवटपर्यंत संघर्षशील राहिले. सत्ताधार्‍यांना धारेवर धरून गरिबांना न्याय मिळवून देण्याची त्यांची कार्यशैलीमुळे अफलातून होती. राज्यातही कामगार चळवळ बळकट केली, अशा आठवणी र्शी. आडम यांनी सांगितल्या.
पक्षाचे प्रदेश सचिव अँड. एम. एच. शेख यांनीही शोक व्यक्त केला. गेली 55 वर्षे ते चळवळीत होते. त्यांच्या जाण्याने आम्ही पोरके झालो, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
यशस्वी वाटाघाटी
कामगारांच्या प्रश्नांवर कामगारमंत्री असोत की, मुख्यमंत्र्यांसमवेत यशस्वी वाटाघाटी करण्यात बजाज पुढे असायचे. त्यामुळे मंत्र्यांकडून त्यांची प्रशंसा व्हायची. मागण्या मांडताना अतिरेक नाही, पण कामगारांचे हित हेच त्यांचे उद्दिष्ट असायचे. बजाज नावाचा माणूस मार्क्‍सवादाचा अभ्यास करून चळवळीत येतो, याचे त्या काळात अप्रूप होते. या चळवळीच्या तत्त्वज्ञानाशी ते अखेरपर्यंत बांधील होते. अशा नेत्याच्या जाण्याने चळवळीची हानी झाली.