आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काडादी गोळीबार, दोघांची पोलिस कोठडी वाढली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या कारवर झालेल्या गोळीबारप्रकरणी अटकेत असलेल्या दोघा संशयितांच्या पोलिस कोठडीत सोमवारी न्यायदंडाधिकारी डी.वाय. गौड यांनी एक दिवसाची वाढ केली.
अक्कलकोट तालुक्यातील जेऊर येथील सरपंच महांतेश पाटील, आहेरवाडीचा बापू दिंडूरे या दोघांना गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती. 9जुलैपर्यंत त्यांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली होती. या गुन्ह्यात आणखी कुणाचा सहभाग आहे काय, गोळीबारानंतर पडलेली पुंगळी अजून सापडली नाही, याचा तपास करायचा आहे. यासाठी वाढीव पोलिस कोठडीची मागणी विजापूर नाका पोलिस ठाण्याचे निरीक्षक विकास रामगुडे यांनी केली. आरोपीचे वकील अँड. मधुकर देवडकर यांनी तपास पूर्ण झाला असून, जप्त करण्यासारखे काही उरले नाही, असा युक्तिवाद केला. सरकारतर्फे अँड. एस.बी. सुपनूर यांनी तपास प्रगतिपथावर असून, गुन्ह्यातील बारीकसारीक माहिती घ्यायची आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. या प्रकरणातील तिघांची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने संशयितांच्या पोलिस कोठडीत एक दिवसाची वाढ केली.
जलदगतीने तपास - 30 जून रोजी सिध्देश्वर कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत म्हणजे 2 जुलैला मध्यरात्री संशयित आरोपी महांतेश पाटील याला अटक करण्यात आली. 4 जुलैला बापू दिंडूरेला अटक झाली. तीन दिवसांत गुन्ह्याचा छडा गुन्हे शाखा व विजापूर नाका पोलिसांनी लावला.