आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कळम-पाटील सोलापूर मनपाचे आयुक्त, मंगळवारी वा गुरुवारी रूजू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- गेल्या दोन महिन्यांपासून रिक्त असलेल्या सोलापूर महापालिका आयुक्तपदी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार कळम-पाटील यांची नियुक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्याबाबतचा आदेश शनिवारी निघाला. बदलीचा आदेश मिळाला असून, मंगळवार वा गुरुवारी पदभार घेईन, असे नवे आयुक्त कळम-पाटील यांनी सांगितले.
आयुक्त गुडेवार यांची फेब्रुवारीला बदली झाली. त्यानंतर ठाणे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर गायकवाड यांची नियुक्ती झाली. पण ते हजर झाले नाहीत. त्यांची नियुक्ती सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून झाली. कळम-पाटील मूळचे अंबाजोगाईचे. १९८७ मध्ये प्रशासकीय सेवेत दाखल झाले.

औरंगाबाद,लातूर,परभणी येथे कामाचा अनुभव आहे. नोव्हेंबर २०१३ पासून रत्नागिरी येथे कार्यरत आहेत. ते यापूर्वी मुंबई महापालिकेचे उपायुक्त होते.

कडक आणि शिस्तप्रिय : कळम-पाटीलगत सव्वा वर्षापासून रत्नागिरी जि. प. येथे कार्यरत आहेत. या काळात त्यांनी २८ जणांवर कारवाई केली. यात मुख्याध्यापक, पशुवैद्यकीय अधिकारी, शाखा अभियंता, शिक्षकासह कामचुकार लिपिकाचा समावेश आहे. चांगले काम करणा-यांना जागेवर प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्याचा त्यांचा लौकिक आहे. तत्काळ निर्णय आणि ताबडतोब अंमलबजावणी ही त्यांची वैशिष्ट्ये. फाइल प्रलंबीत ठेवत नाहीत. त्यावर झटपट निर्णय घेतात.

लवकरच पदभार
सोलापूर महापालिका आयुक्तपदाचा आदेश मिळाला आहे. मंगळवारी वा गुरुवारी पदभार घेईन. विजयकुमारकळम-पाटील, सोलापूरमनपाचे नवे आयुक्त
बातम्या आणखी आहेत...