आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी तर फक्त चाचपणी करतोय : संजय शिंदे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - करमाळा मतदार संघातून मी तर फक्त चाचपणी करतोय, जनतेची मते जाणून घेतोय. मी पक्षाकडे इच्छुक असल्याचे कळवले नाही, इच्छुक असल्याचा अर्जही भरला नाही. यामुळे मी कसा इच्छुक असेन? असे सवाल जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष संजय शिंदे यांनी केला.

लोकसभा निवडणुकीपासून अस्वस्थ असलेले संजय शिंदे सध्या करमाळा विधानसभा मतदार संघातून निवडणुकीची तयारी करत आहेत. त्यादृष्टीनेच ते गेल्या दोन महिन्यांपासून करमाळा मतदार संघातील विविध गावांचा दौरा व लोकांच्या भेटी घेत आहेत. उमेदवारी अर्ज भरणार का? या विषयी श्री. शिंदे म्हणाले, मी इच्छुक असलो तरी अर्ज भरण्याविषयी आताच सांगता येणार नाही. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याविषयी मी करमाळा मतदार संघातील जनतेची मते जाणून घेत आहे. त्याविषयी चाचपणी करत आहे.

आजपर्यंत ५० गावांतील जनतेला भेटलो आहे, त्यांचा कौल विचारात घेऊन पुढील रणनीती ठरवणार आहे. तुमच्या उमेदवारीला विरोध होईल. तेव्हा काय कराल? असे विचारले असता श्री. शिंदे यांनी आजपर्यंत माझी राजकीय वाटचाल, प्रगती ही विरोधातूनच झाली आहे. यामुळे मला विरोध होणार हे गृहित धरूनच मी सुरुवात केली आहे, असे सांगितले.

३६ गावांवर हक्क
करमाळा मतदारसंघाला माढा तालुक्यातील कुर्डुवाडी नगरपालिकेसह ३६ गावे जोडण्यात आली आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत उमेदवार विजयी होण्यासाठी संजय शिंदे यांची भूमिका प्रमुख ठरली आहे. यामुळेच शिंदे हे स्वत:च करमाळा मतदार संघातून इच्छुक असल्याची चर्चा आहे.
विकासावर चर्चा
मी लोकांचे प्रश्न समजून घेतोय. त्यांना नेमका कोणत्या मुद्द्यावर विकास हवाय, तोही जाणून घेतोय. गेल्या काही दिवसांपासून करमाळा तालुक्यातील अनेक लोक विठ्ठल कार्पाेरेशनवर येऊन माझ्या यशस्वी प्रकल्पांची माहिती घेत आहेत. मी एक खासगी कारखाना चालवतो. इतर कारखान्यांच्या तुलनेत सर्वाधिक ऊस दर देतो. नवी सूतगिरणीही उत्पादनाचे विक्रम करत आहे. या सर्व गोष्टींसह माझ्या इतर अनेक विकास प्रकल्पांचा लोक विचार करतील, अशी मला अपेक्षा आहे.
संजय शिंदे, विठ्ठल कॉर्पोरेशनचे, चेअरमन