आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टेशन व्यवस्थापकांमुळे ‘केके’चा अपघात टळला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - स्टेशन व्यवस्थापकांमुळे कर्नाटक एक्स्प्रेसचा अपघात टळला. इंजिनच्या एक्सेलमध्ये बिघाड होऊन धूर निघत असल्याचे त्याने पाहिले आणि गाडी थांबवण्याची सूचना दिली. गाडी थांबली नसती तर इंजिनसह डबे घसरून मोठी हानी झाली असती. अहमदनगरच्या दोन स्थानकांआधी लागणार्‍या सारोळा स्टेशनवर हा प्रकार घडला.

बंगळुरूहून नवी दिल्लीकडे जाणारी केके एक्स्प्रेस गुरुवारी सकाळी साडेअकराला सारोळा रेल्वे स्थानकातून रवाना होणार होती. व्यवस्थापक निश्चल कुमार यांनी गाडीला हिरवा झेंडा दाखवताच गाडी निघाली. तेवढय़ात इंजिनच्या चाकाजवळ एक्सेलमधून धूर येताना त्यांना दिसला. धुरामुळे त्यांच्या संशय बळावला. तोपर्यंत गाडी पुढे गेली होती. निश्चल कुमारांनी वॉकीटॉकीवरून चालकाला गाडी थांबण्याची सूचना दिली. एक्सेलची पट्टी घासत असल्याने ती लाल झाली होती आणि त्यामुळे धूर निघत होता.

गाडी तासभर थांबवण्यात आली. त्यानंतर दोनपैकी एक इंजिन सावकाश बाजूला काढले. एक इंजिन जोडून ती अहमदनगरला रवाना झाली. त्यावेळी तिची गती कमी ठेवण्यात आली. तेथे दुसरे इंजिन जोडण्यात आले. त्यानंतरही नवी दिल्लीच्या दिशेने रवाना झाली.

बक्षिस देणार
स्टेशन व्यवस्थापकांच्या सतर्कतेमुळे अपघात टळला. त्यांना बक्षीस देऊन सन्मान करण्यात येणार आहे.’’ सुशील गायकवाड, जनसंपर्क अधिकारी