आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Karunashil Awards Distribution Ceremony In Kirloskar Hall

रुग्ण वेदनेवर फुंकर घालणाऱ्या परिचारिका असतात ध्येयवादी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- रुग्णसेवेतील समर्पित नर्सिंग आणि शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षक ही दोन्ही क्षेत्रे ध्येयवादी व्यक्तींमुळेच अजूनही टिकून आहेत. रुग्णांच्या वेदनेवर फुंकर घालणारी परिचारिका ध्येयवादी असल्यानेच समाज आरोग्य अबाधित असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बुधवारी येथे केले. किर्लोस्कर सभागृहात करुणाशील पुरस्कारांचे वितरण श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले, या वेळी ते बोलत होते.
या वेळी व्यासपीठावर महापौर सुशीला आबुटे, आमदार प्रणिती शिंदे, प्रा. शिवाजी सावंत, डॉ. श्रीकांत येळेगावकर, करुणाशील पुरस्काराचे संयोजक आशुतोष नाटकर, बिना बेबी शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी गौतमी जितुरे यांनी स्वागतगीत सत्यम् शिवम् सुंदरम् गीत सादर केले.
श्री. शिंदे म्हणाले, ‘वाडिया हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या डॉ. सुलुताई आवटे यांच्या घरात काम करताना खूप काही शिकायला मिळाले. माझ्या आत्मचरित्रातही त्याचा उल्लेख आहे. १९५६ च्या आसपासचा हा काळ. नंतर ५७ मध्ये मला सरकारी नोकरी लागली. पण तेव्हाचे मला आजही आठवते.
भगिनींच्या कार्याचे कौतुक
वत्सलाताईंची उपस्थितीत त्यांचा मुलगा आशुतोष पुरस्कार देतोय. सर्व संयोग जुळून आलाय. नर्सिंग क्षेत्र आव्हानात्मक आहेच. रुग्णांच्या अडचणी समजून घेत सेवा उपचार देणे. आज या भगिनींना पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या कार्याचे कौतुक करता आले. परगावाहून, या कार्यक्रमासाठी येणाऱ्या भगिनींना एक दोन दिवस वास्तव्य करण्यासाठीची निवासाची सोय द्यावी, असे शिंदे म्हणाले.
या वेळी प्रा. नसीम पठाण यांनीही मनोगत व्यक्त केले. करुणाशील पुरस्कार मिळाल्याबद्दल शहाणे, माहुलीकर, वेदपाठक यांनी भावना व्यक्त केल्या. श्री. नाटकर यांनी प्रास्ताविक केले. हकीम शेख यांनी सूत्रसंचालन केले.