आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kashid First In Inter College Running Competition At Solapur

रोड रेस : सांगोल्याचा काशीद अव्वल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूरिवद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन मैदानी स्पर्धेतील २१ किलोमीटर रोड रेस शर्यतीत सांगोला महाविद्यालयाच्या गोरखनाथ काशीद याने अव्वल स्थान पटकावले. कुर्डुवाडीच्या के. एन. भिसे महाविद्यालयाच्या नामदेव खारे सुधीर गोडगे यांनी अनुक्रमे द्वितीय तृतीय स्थान मिळवले.
दयानंद महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत चार बाय शंभर मीटर रिले शर्यतीत पंढपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाने प्रथम, अकलूजच्या शंकरराव मोहिते महाविद्यालयाने द्वितीय तर बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाने तृतीय स्थान मिळवले.
अन्यिनकाल (प्रथम, द्वितीय तृतीय) : पुरुष : ४००मीटर धावणे : एम. एस. फाटे (केबीपी,पंढरपूर), ए. टी. शेख (मोहिते, अकलूज), एस. पी. जाधव (शिवाजी, बार्शी) .
४००मीटर अडथळा : आर.टी उसपे (मोहिते, अकलूज), जे. एस. प्रभात (भिसे, कुर्डवाडी), ए. डी. सोनवणे (दयानंद).
हातोडाफेक : अमोलिशंदे (मोहिते, अकलूज), संकेत खर्चे, विशाल पोफळे (दोघे सांगोला). भालाफेक : ए, पी. तनपुरे (गरड, मोहोळ).
बांबूउडी : ए.डी. माने (शिवाजी, बार्शी), एस. पी. वाघमोडे (भारत, जेऊर). तिहेरी उडी : एन. एस. देठे (केबीपी, पंढरपूर), ए. एस. जाधव (संगमेश्वर), एस. बी. खेंडे मोहिते, अकलूज).
रोड रोस शर्यतीतील अंतिम क्षणाचा दयानंदच्या मैदानावर रविवारी सकाळी टिपलेला क्षण. अग्रभागी गोरखनाथ काशीद. त्यामागे नामदेव खारे.