आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Katare Murder Case At Solapur, Three Accused Narco Test Issue

कटारे खून प्रकरण: कागदपत्रांचे सीआयडीकडे हस्तांतर सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - गुरुनाथ कटारे खून प्रकरणातील तिघा संशयित आरोपींची नार्को चाचणी करण्याच्या अर्जावर मंगळवारी अक्कलकोटचे न्यायाधीश दिवाण यांच्या न्यायालयात सुनावणी होती. पोलिसांनी तीन दिवसांची मुदत मागून घेतल्यामुळे पुढील सुनावणी १९ डिसेंबर रोजी होणार आहे. कटारे खून प्रकरणाचा तपास दोन दिवसांपूर्वी सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. त्याची कागदपत्रे अद्याप सीआयडीकडे देण्यात आली नाहीत. तपास अधिकारी मंगळवारी न्यायालयात हजर राहून हा तपास सीआयडीकडे देण्यात आला आहे. कागदपत्रे हस्तांतर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तीन दिवसांनी सीआयडी पोलिस म्हणणे मांडतील असा अर्ज देण्यात आला आहे. त्यावर न्यायालयाने शुक्रवारी सुनावणी ठेवली आहे. सरकारतर्फे अॅड. टोणपे, आरोपीतर्फे अॅड. संतोष न्हावकर यांनी काम पाहिले.

घरफोडी;चोराला एक वर्षे शिक्षा : विडीघरकुल देसाई नगरात राहणारे चंद्रकांत देवकर यांच्या घरातील चोरीप्रकरणी एका चोराला एक वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली. भागण्णा काशनिाथ जमादार (वय ३१, रा. गुर्देहळळी, दक्षिण सोलापूर) याला शिक्षा झाली. चंद्रकांत निंबर्गी (रा. निलमनगर) याला निर्दोष सोडण्यात आले. हा निकाल न्यायाधीश पी. व्ही. हिंगणे यांना दिला. सव्वीस मार्च २०१३ रोजी जमादार यांच्या घरात चोरी झाली होती. बोरमाळ दोन हजार रुपये पळवण्यात आले होते. एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल होता. फौजदार कुंदन सोनोने यांनी तपास करून आरोपपत्र दाखल केले होते. सरकारतर्फे एस. डी. वरपे, आरोपीतर्फे अॅड. आजमोद्दीन शेख यांनी काम पाहिले.

हणामारी;चौघांना दंड : क्षीरलिंगनगरात राहणारे रघुनाथ बंदगी यांना मारहाण केल्याप्रकरणी चौघांना न्यायाधीश पी. व्ही. हिंगणे यांनी पंधरा हजार रुपयांच्या बॉंडवर आणि एक वर्षभर चांगल्या वागणुकीवर सोडून दिले. भारत मंत्री, गजानन तडवळे, लक्ष्मण बोडा, सुनील नोल्लूर (रा. सर्वजण विडी घरकुल) यांना दंड झाला. फेब्रुवारी २०११ मध्ये घटना घडली होती. डोक्यात बाटली फोडून मारहाण झाली होती. एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल होता.