आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Katare Murder Case Probe Should Be CID, Mumbai High Court Order

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कटारे खून प्रकरणाचा तपास सीआयडीकडेच, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - दक्षिणपंचायत समितीचे सदस्य गुरुनाथ कटारे यांच्या खून प्रकरणाचा तपास सीआयडीकडे कायम ठेवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायलयाचे न्यायमूर्ती व्ही. के. ताहिलरमाणी, आय. के. जैन यांनी बुधवारी दिले. २३ डिसेंबर रोजी तपास पोलिसांकडे देण्याच्या मागणीवर उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली होती. पंडित कटारे, शिवलिंग पारशेट्टी यांनी तपास सीआयडीकडे देऊ नये, पोलिसांकडेच द्यावा अशी याचिका दाखल केली होती.
न्यायमूर्ती ताहिलरमाणी जैन यांच्या न्यायालयात बुधवारी या अर्जावर सुनावणी झाली. संशयित आरोपींच्या नातेवाइकांच्या मागणीवरून हा खटला सीआयडीकडे देता येत नाही, असे मत सरकारतर्फे सुनील मनोहर, एस. के. शिंदे यांनी मांडले. या खटल्याला राजकीयरंग देण्यात आला आहे. सीआयडीकडे तपास दिल्यास दुजाभाव होणार नाही. अशी तक्रार फिर्यादीची नाही, असा युक्तिवाद पाटील यांच्यातर्फे अॅड. महेश जेठमलानी, अॅड. प्रियल सारडा यांनी केला. या आदेशाला दोन आठड्यांची स्थगिती द्यावी. आम्हाला सर्वोच्च न्यायलयात दाद मागायची असे फिर्यादीतर्फे अॅड. शशी पुरवंत यांनी अर्जाद्वारे बाजू मांडली. तो अर्ज न्यायालयाने फेटाळला. सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे पुरवंत म्हणाले.

आतापर्यंतची स्थिती
१३आॅक्टोबर रोजी खून,सोलापुरातून तिघे संशयित अटकेत, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचा मुलगा रमेशकडे संशयाचे बोट,तपास सीआयडीकडे देण्याची माजी आमदार पाटील यांची मागणी पोलिस महासंचालक कार्यालयाने सीआयडीला दिले तपासाचे आदेश. मूळ तपास साहाय्यक पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी केला, सीआयडीचे उपअधीक्षक महादेव बिराजदार तपास करणार