आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी खेलबुडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या रविवारी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी दै. "संचार'चे विक्रम खेलबुडे हे तिसऱ्यांदा निवडून आले. उपाध्यक्षपदी दैनिक "दिव्य मराठी'चे पत्रकार रामेश्वर विभूते यांची तर चिटणीसपदी "दिव्य मराठी'चे संजय जाधव यांची निवड झाली आहे.
रविवारी सकाळी साडेदहा वाजता चार पुतळा परिसरातील पत्रकार संघाच्या कार्यालयात ही निवडणूक झाली. या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश अभंगे, शंकर जाधव, अभय दिवाणजी यांनी काम पाहिले.

सोलापूर श्रमिक पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा विक्रम खेलबुडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत निवडीची प्रक्रिया पार पडली. या वेळी सचिवपदी "लोकमत'चे जगन्नाथ हुक्केरी यांची तर खजिनदारपदी दै. "सुराज्य'चे दीपक शेळके यांची निवड झाली. पत्रकार संघाच्या सल्लागारपदी प्रशांत माने - "पुढारी', नारायण कारंजकर - "तरुण भारत', जे. टी. कुलकर्णी - "संचार', शांतकुमार मोरे, रमेश महामुनी - "संचार' यांची चिठ्ठ्यांद्वारे निवड करण्यात आली. एका व्यक्तीस एकदाच अध्यक्ष होता येईल, अशी घटनादुरुस्ती करण्याची मागणी काही सदस्यांनी केली. त्यावर "लोकशाही, लोकशाही' अशा जोरदार घोषणा दिल्या.
निवडणूक बैठकीत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप, हमरी-तुमरी
सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वार्षिक सभेत एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप करत तंगडे तोडण्याची, जोड्यांनी हाणण्याची भाषा केली. अध्यक्षपदाच्या स्पर्धेतून हा प्रकार झाला. ज्येष्ठ आणि कनिष्ठांमध्ये हमरी-तुमरी झाली. या वेळी वरिष्ठ पत्रकारांकडून असभ्य शिव्या सुरू झाल्यानंतर कनिष्ठानेही ‘बाहेर या, थिंबून थिंबून मारीन...’ अशी भाषा केली.
चार पुतळ्याच्या मागे असलेल्या संघाच्या कार्यालयात सकाळी सभेला सुरुवात झाली. संघाच्या नावाने बँकेत असणाऱ्या मुदत ठेवी अन्य बँकेत ठेवल्याच्या आक्षेपावरून प्रचंड गोंधळ झाला. आरोप - प्रत्यारोप झाले. विदर्भ कोकण या बँकेत ठेवी ठेवून अध्यक्षांनी त्यावर कर्ज घेतले, अशा जोरदार आक्षेप होता. हाच आक्षेप सोशल मीडियावर नोंदवला गेला. त्यात एका वरिष्ठ पत्रकाराला ‘लाभार्थी’ म्हटले गेेले. त्याचा राग मनात धरून "त्या' वरिष्ठांनी कनिष्ठाकडे विचारणा केली. तंगडे तोडून गळ्यात टाकीन असे म्हटले. संतापलेल्या वरिष्ठांनी शिवीगाळ सुरू केली. कनिष्ठही त्यांना त्याच भाषेत उत्तरे देत होते. त्यामुळे वातावरण तापले होते. सुमारे तीन - साडेतीन तास चाललेल्या गदारोळानंतर मतदान झाले.

उपाध्यक्ष - शरीफसययद -दै. "पुण्यनगरी', चिटणीस - बाळकृष्ण दोड्डी -"सकाळ', कार्यकारिणीसदस्य - अश्विनीतडवळकर -"दिव्य मराठी', मिलिंद राऊळ - "लोकमत', बाळासाहेब बोचरे -"लोकमत', महेश पांढरे -"पुढारी', वैभव गाढवे -"सकाळ', हरिभाऊ कदम -"संचार', किरण बनसोडे -"पंढरी भूषण', संतोष आसबे -"पुढारी' , नितीन पात्रे -"डेन चॅनल', पुरुषोत्तम कारकल -"सकाळ', अरुण रोटे -"तरुण भारत', दीपक सोमा -"इन न्यूज', अविनाश संतोजी -"तरुण भारत', मंगेश देशमुख -"तरुण भारत', अखलाख शेख -"सुराज्य', प्रताप राठोड -"पुण्यनगरी', रामकृष्ण लांबतुरे -"सांगली तरुण भारत'.
...तर मी तोंड काळे करीन
‘संघाच्या ठेवी विदर्भ कोकण बँकेत ठेवून मी किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांनी कर्ज घेतल्याचे दाखवून द्या, तोंड काळे करून सोलापूर सोडून देईन’ असे संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे म्हणाले. तरीदेखील काहीचे समाधान झाले नाही. त्यांचे आरोप सुरूच होते. श्री. खेलबुडे हे तिसऱ्यांदा निवडणुकीसाठी मैदानात उतरले. खेलबुडे यांना १२७ तर प्रतिस्पर्धी "दिव्य मराठी'चे चंद्रकांत मिराखोर यांना १९ मते पडली. पत्रकार संघाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होण्याचे हे चौथे वर्ष होते.
बातम्या आणखी आहेत...