आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

किल्ला बाग राहणार दोन दिवसांसाठी बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महापालिकेकडून यंदा शुक्रवारी आणि शनिवार या दोन दिवशी किल्ला बाग बंद ठेवण्यात येणार आहे. गेल्या वर्षी रमजाननंतर होणार्‍या बाशी खुदबाच्या दिवशी भुईकोट किल्ल्यात असलेल्या प्राचीन मल्लिकार्जुन मंदिरातील शिवलिंगाची काही समाजकंटकांकडून विटंबना करण्यात आली होती. यानंतर शहरात तणावाचे वातावरण तयार झाले होते. त्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फौजदार चावडीचे पोलिस निरीक्षक अरुण वायकर यांनी पुरातत्त्व खात्याला बाग बंद ठेवण्याचे विनंतीपत्र गुरुवारी दिले.

त्यानुसार पालिकेच्या उद्यान विभागाने दोन दिवस बाग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. यंदाच्या वर्षी असा काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून फौजदार चावडी पोलिसांनी आधीच दक्षता घेतली आहे. शहराची शांतता धोक्यात येईल असे प्रकार होऊ नयेत म्हणून पोलिस निरीक्षक र्शी. वायकर यांनी पुरातत्त्व विभागाला या काळात बाग बंद ठेवावी, अशी लेखी विनंती केली.

पुरातत्त्व खात्यानेही सामाजिक शांतता अबाधित राहण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तसेच या पत्रव्यवहारांचा विचार करता पालिकेच्या उद्यान विभागानेही दोन दिवस बाग बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती उद्यान विभागाचे डॉ. सुहास लांडगे यांनी दिली.