आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंगणवाडी कर्मचार्‍यांचे धरणे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सेवानिवृत्ती वेतन, मानधन वाढ या प्रमुख मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याप्रकरणी राज्यभरातील अंगणवाडी कर्मचार्‍यांचे गेल्या 11 दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

गेल्या अनेक वर्षांपासून अंगणवाडी कर्मचारी त्यांच्या मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करत आहे. महिला व बालविकास मंत्री वर्षा गायकवाड यांनी संघटनेच्या मागण्या सोडवण्याचे आश्वासन दिले होते. पण, अद्याप काहीच हालचाली झाल्या नाहीत. गेल्या बुधवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संघटनेशी चर्चा केली. आंदोलन मागे घेण्याची मागणी त्यांनी केली. पण, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका संघटनांनी घेतली.

पोलिओ मोहिमेत सेविकांचा सहभाग नाही

मागण्या मंजूर होईपर्यंत संप सुरूच राहणार आहे. शासनाने दखल न घेतल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवणार आहोत. रविवारी पल्स पोलिओ मोहिमेतही कर्मचारी संघ सहभागी होणार नाही. आंदोलनाला शंभर टक्के प्रतिसाद मिळत आहे. सूर्यमणी गायकवाड, प्रदेश उपाध्यक्ष, अंगणवाडी कर्मचारी संघटना

या आहेत आंदोलनकर्त्यांच्या मागण्या

सेवानिवृत्ती वेतन लागू करा
मानधनात वाढ करण्यात यावी
टीएचआर बंद करा
आजारपणाची रजा लागू करा
जनर्शी योजनेची अंमलबजावणी करा