आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

किर्लोस्कर-वसुंधरा चित्रपट महोत्सव 24 जुलैपासून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - किर्लोस्कर-वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या 24 ते 27 जुलै दरम्यान येथे होत असल्याची माहिती किर्लोस्कर उद्योग समूहाचे मनुष्यबळ सरव्यवस्थापक डॉ. एस. पी. वैद्य यांनी पत्रकारांना दिली. किर्लोस्कर समूह आणि सृजन फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव होत आहे.

पर्यावरण, वन्यजीवन, ऊर्जा, हवा, पाणी या पाच विषयांना वाहिलेला हा महोत्सव डॉ. निर्मलकुमार फडकुले संकुलात तीन दिवस चालेल. महोत्सवात राष्टÑीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेले सुमारे 15 देशांतील 40 चित्रपट, लुघपट दाखविण्यात येतील. प्रवेश विनामूल्य असून प्रवेशिकेसाठी होटगी रस्त्यावरील किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रिज (शिवशाही) येथे किंवा सुंदर फोटो (लकी चौक) येथे संपर्क साधावा.

सलग पाचव्या वर्षी वसुंधरा महोत्सव विविध शहरांमध्ये आयोजिला जात आहे. यावर्षी 42 शहरांतून आमंत्रणे आली होती. त्यापैकी 23 शहरांत हा महोत्सव आयोजित होणार आहे. येथे सोलापूर विद्यापीठ, लोकमंगल प्रतिष्ठान तसेच दहा शाळा, महाविद्यालये, सामाजिक वनीकरण विभाग, हरितक्रांती सेना, रोटरी क्लब, इंटरॅक्ट, तसेच अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्माते, तज्ज्ञ, छायाचित्रकार, दिग्दर्शक यांचे सहकार्य लाभले असल्याचे त्यांनी सांगितले.

या वेळी सोसायटीचे अमोल चाफळकर, सोलापूर विद्यापीठातील प्रा. डॉ. रवींद्र चिंचोलकर, सुभेदार बाबूराव पेठकर, ऋषिकेश कुलकर्णी उपस्थित होते.
महोत्सवाचा विषय
‘स्मॉल एफर्ट, बिग डिफरन्स’ (लहानसा प्रयत्न, फरक मोठा) विषय आहे. रिफ्युज’, ‘रिड्युस’, ‘रियुज’, ‘रिसायकल’, ‘रिकव्हर’ या पाच ‘आर’मधून पर्यावरण जपण्याचा संदेश देण्यात आला आहे. ‘वसुंधरा वाचवा, तगवा आणि टिकवा’ हे यंदाचे घोषवाक्य आहे.
24 जुलै - छायाचित्र व चित्रपट कार्यशाळा, उद्घाटक रामदास कोकरे
25 जुलै - पर्यावरण दिंडी, चित्रकला स्पर्धा, चित्रपट
26 जुलै - नेचर वॉक, प्रश्नमंजूषा, हसत खेळत पर्यावरण, पथनाट्य, चित्रपट