आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरच्या बेदाण्याची जगात ‘वाहवा’, बाजारपेठेची मात्र ‘वानवा’!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- जगात उत्पादनात तिसरा क्रमांक असणार्‍या सोलापूरच्या बेदाण्याचा नावलौकिक मोठा, पण सोलापुरात सौदेबाजार उपलब्ध नाही ही खंत आहे. वर्षाकाठी जवळपास 40 हजार टन उत्पादन आणि येथेच सौदेबाजार झाला तर बाहेर जाणारी 500 कोटींची उलाढाल यातूनच व येथेच होणार आहे. यासाठी पुरेसे प्रयत्न सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने व राज्य द्राक्ष बागायतदार संघ करत आहेत.

प्रयत्नांना हवंय यश
सभापतींकडून विविध नवे प्रयोग करण्यात येत आहेत. चार मजली शीतगृह असून अनुक्रमे 400 व 200 मे. टनाचे तीन मजले आहेत. तसेच याच्या देखभालीसाठी शिक्षीत कर्मचारीवर्ग आहे. जगातील बेदाणे बाजार सांभाळणार्‍या व्यापार्‍यांना बोलावून केवळ बाजारपेठच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्याचा त्यांना प्रयत्न आहे.

शेतमालाच्या दरावर येथील बाजाराचे दर ठरायचे. परंतु राज्यातील तिसर्‍या क्रमांकावर असणार्‍या बाजार समितीमध्ये होणारी मालाची आवक पाहता आता स्थानिक बाजारपेठेत निघालेल्या दरावर राज्यातील मालाचे दर ठरत आहेत.

तमालाच्या दरावर येथील बाजाराचे दर ठरायचे. परंतु राज्यातील तिसर्‍या क्रमांकावर असणार्‍या बाजार समितीमध्ये होणारी मालाची आवक पाहता आता स्थानिक बाजारपेठेत निघालेल्या दरावर राज्यातील मालाचे दर ठरत आहेत.

यात हवी सुधारणा
येथील व्यापार्‍यांनी परदेशी बाजारपेठ शोधावी.
बाजार समितीने व्यापार्‍यांना संरक्षण द्यावे.
परकीय बाजारपेठेला आकर्षित करावे.
पूर्वेकडे जाणारे मुख्य महामार्ग सोलापुरातून

बाजार समितीची शक्तिस्थळे
कांदा सेलहॉल, एक हजार टनाचे शीतगृह, मिरची विभाग, भाजीपाला व फळ विभाग, भुसार आडत विभाग, बाजारभाव डिस्प्ले फलक, दररोज लिलाव, लिलावापूर्वी मालाचे वजन, सुसज्ज कार्यालय, सुरक्षा रक्षक आणि संरक्षक भिंत आदी.

बेदाण्यांचे मार्केटिंग करणार
मार्च पूर्वीच उत्पन्नात सध्या 40 कोटींची वाढ झाली आहे. मार्चअखेरपर्यंत ही उलाढाल हजार कोटीपर्यंत जाईल. परजिल्ह्यातील व्यापारी आणि शेतकर्‍यांना आकर्षण्यासाठी व योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी बाजार समितीमार्फत विविध योजना राबविणार.’’ दिलीप माने, सभापती

बेदाणे सौदे सुरू करणार
"जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या हिताची अशी आपल्या बाजार समितीची ख्याती आहे. शेतकर्‍यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी व नवी बाजारपेठ सुरू करण्यासाठी बेदाणे सौदे सुरूकरण्यासाठी प्रयत्न करणार.’’
-राजशेखर शिवदारे, उपसभापती

सौदे होत नसल्यामुळे अडचण
"अफगाणिस्तान, टर्कीनंतर सोलापूरच्या बेदाणे उत्पादनाचा क्रमांक लागतो. त्याला मागणीही आहे. सोलापुरात सौदे होत नसल्यामुळे बागायतदारांची अडचण होते. दुसर्‍या बाजारपेठेत खेटे मारावे लागतात. ते येथे व्हावेत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ’’
- डॉ. महेंद्र शाहीर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य बागायतदार संघ

यशोगाथा
जगात उत्पादनात तिसर्‍या क्रमांकावर, शीतगृहासह सेलहॉलची सुविधा, सौदे होण्यासाठी सभापती मानेंसह संचालक मंडळ व द्राक्ष बागायतदार संघाचे प्रयत्न सुरू