आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर पोलिसांकडून झाली चौकशी, मोबाइल दुकानात चोरीचा प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापुरातील ज्योती टेलिकॉम मोबाइल दुकानात चोरीचा प्रयत्न करून पळून जाताना बिहारच्या दोघा चोरांना रविवारी पकडले होते. सोमवारी त्या दोघांची चौकशी कोल्हापूर पोलिसांनी सोलापुरात येऊन केली. तिथेही काही मोबाइल दुकान फोडले आहेत. त्या घटनेत यांचा काही संबंध आहे का याची खातरजमा सुरू आहे. शिवाय शुक्रवारी ही टोळी सोलापुरात आली होती. गुरुवारी मध्यरात्री नाशिकमधील एका कापड दुकानात चोरी करून अडीच लाख रुपये आणले होते. चौकशीत त्यांनी ही माहिती दिल्यानंतर नाशिक पोलिस आयुक्तांना ही माहिती दिली असून तेही पथक सोलापुरात येत आहे.

सीसीटीव्ही फुटेज
याप्रकरणातील आठजणांपैकी सहाजण पळून गेले होते, त्यांचा शोध अद्याप लागला नाही. अटकेत असलेल्यांची चौकशी सुरू आहे. संशयित दिवाण हा ज्योती टेलिकॉममध्ये गेला होता. त्याची सीसीटीव्ही फुटेज लॉजमधील फुटेज जुळवाजुळव करीत असल्याची माहिती सदर बझारचे पेलिस निरीक्षक संजय जगताप यांनी दिली.