आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Krishna Bheema Stririkaran Scheme Issue At Solapur

स्थिरीकरण योजना अजितदादांचीच; डोंगरे, गादेकरांचा दावा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेला अजित पवार यांनीच 2004 मध्ये हिरवा कंदील दाखवला. 4 हजार 932 कोटी रुपयांच्या प्रकल्प खर्चाला मान्यताही दिली. ही वस्तुस्थिती असताना काही जण पवार हे स्थिरीकरणाच्या विरोधात असल्याचे चित्र रंगवत आहेत. त्यांना नाहक बदनाम करत आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे आणि शहराध्यक्ष महेश गादेकर यांनी रविवारी पत्रकारांना सांगितले.

स्थिरीकरणाची योजनाच अजित पवारांनी मांडली. त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू, असा निर्धारही या मंडळींनी व्यक्त केला. परंतु बदनाम करणारे ते कोण? या प्रश्नाचे नेमके उत्तर मात्र त्यांना देता आले नाही. भाजप, शिवसेना, शेतकरी संघटनाही यांची नावे त्यांनी घेतली. पण विजय-प्रताप मंचच्या वतीने सुरू केलेल्या स्थिरीकरणाच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहिमेला भाजप- शिवसेनेने पाठिंबा दिल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर ते निरूत्तर झाले. ‘विजयसिंह मोहिते बदनाम करत आहेत का?’ असा प्रश्न केल्यानंतर त्यांनी सारवासारव केली.