आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिकूलतेत कृष्णाने केले आमचे स्वप्न साकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - ‘‘दारिद्रय़ामुळे शिक्षण द्यावे की नाही असा प्रश्न होता. तरीही परिस्थितीतून मार्ग काढत मुलास शिक्षण दिले. त्याने उत्तम यश मिळवले. आमचे स्वप्न साकार केले.’’ ही भावना कृष्णा डोईजोडेची आई रार्जशी यांनी व्यक्त केली. त्यावेळी त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणवल्या होत्या. कृष्णा दहावीत 95.82 टक्के गुण मिळवून विद्या निकेतन प्रशालेत प्रथम आला आहे.

आई-बाबांच्या काळी शिक्षण नव्हते असे नाही. परंतु ते घेण्यासाठी माफक पैसा नव्हता. शिलाई मशीनचे काम करणार्‍या कृष्णाच्या आई-वडिलांच्या त्यांच्या राहून गेलेल्या स्वप्नांची पूर्तता करण्याची इच्छा त्याच्यात पाहिली. आई पिशव्या शिवण्याचे काम करते, तर बाबा गारमेंटचे कपडे शिवतात. त्यांच्या नशिबी जे आले ते मुलाच्या नको म्हणूनच त्यांनी कृष्णाला खूप शिकवायचे, अशी इच्छा त्यांची होती.

त्याच्या कष्टाचे यश
कृष्णाने दिवस-रात्र आपले लक्ष केवळ अभ्यासावर केंद्रित केले. त्यातून हे यश प्राप्त केले. त्याच्या कष्टाचे गमक त्याने अहोरात्र के लेल्या अभ्यासातच आहे.’’ रार्जशी डोईजोडे, आई

मला व्हायचंय इंजिनिअर
मितभाषी व साध्या कृष्णाला सिव्हिल इंजिनिअर व्हायचे आहे. उत्तम गुण प्राप्त करण्यासाठी मावशीचा मुलगा प्रेरणादायी ठरला. तो इंजिनिअर असल्याने त्याच्यासारखेच व्हायचे हे लक्षात ठेवले होते. इंजिनिअरचे स्वप्न साकार करण्याची पहिली संधी खेचत आणली आहे.’’ कृष्णा डोईजोडे, गुणवंत विद्यार्थी

छायाचित्र - विद्यानिकेतन प्रशालेतील कृष्णा डोईजोडे शाळेत सत्कार झाल्यानंतर घरी आपल्या आजी राधिकाबाई यांना बिलगला. सोबत आई राजश्री आणि वडील राजेंद्र डोईजोडे.