आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुर्डुवाडीत जनता दरबारला नगरसेवकांनीच मारली दांडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुर्डुवाडी - नगराध्यक्ष जयश्री गोरे आयोजित जनता दरबाराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. शहरातील स्वच्छता,रस्ते, पाणी, वीज आदी समस्यांचे त्यांनी निवेदन दिले. मात्र, प्रभारी मुख्याधिकारी व सर्व नगरसेवकांनी त्याकडे पाठ फिरवली.

नगरपरिषदेच्या (कै.) काशिनाथ भिसे सभागृहात शनिवारी नगराध्यक्ष गोरे व उपनगराध्यक्ष संजय टोणपे यांनी जनता दरबार भरवला होता. शहरातील समस्या आणि करावयाच्या विविध विकासकामांबाबत नागरिकांकडून सूचनाही मागवल्या. या वेळी शहरवासीयांनी विविध समस्यांचा निपटारा करण्याची मागणी केली. यात महिलांसाठी स्वतंत्र शौचालये, गटारींची सफाई, पाण्याचा निचरा, पथदिवे, औषध फवारणी, घंटागाडी यांचा समावेश होता. दीड तासाच्या या जनता दरबारात 36 निवेदन स्वीकारण्यात आले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्ता गवळी, मनसेचे शहराध्यक्ष अमोल घोडके, जीवनरक्षा संस्थेचे राहुल धोका, अतुल फरतडे, किरण बाबर आणि महिलांनीही निवेदन दिले.

याप्रसंगी आरोग्य निरीक्षक तुकाराम पायगण, गाळणी परिचर अतुल शिंदे, विद्युत विभागाचे अविनाश शिंदे, कर वसुली विभागाचे विकास बचुटे, कार्यालयीन अधीक्षक डी. डी. देशमुख, राम अरसुले, रवींद्र भांबुरे हे उपस्थित होते.