आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kurahinasetti Social Rathotsava Issue At Solapur

चित्तथरारक शक्तिप्रयोग, लेझीमपथक अन् बहारदार नृत्याने आली रंगत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - चित्तथरारकशक्तिप्रयोग, मर्दानी लेझीमचे खेळ, तेलुगू आणि हिंदी रिमिक्स गीतांवर नृत्यसंघाने सादर केलेली बहारदार नृत्यांने मद्विरशैव कुरहिनशेट्टी समाजाचा रथोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. कुरहिनशेट्टी ज्ञाती समाजाच्या रथोत्सवास दुपारी १२.२५ वाजता मानकरी तानाजी मुटकिरी यांच्या हस्ते पूजन करून शुभारंभ करण्यात आला. या वेळी विजयकुमार द्यावरकोंडा, आमदार विजयकुमार देशमुख, ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष दीनानाथ धुळम, नंदकुमार मुटिकरी, अनिल धुळम, राजीव कामूर्ती, इरालाल धुळम, सुधाकर द्यावरकोंडा, दत्तात्रय बटगेरी आदी उपस्थित होते.
रथोत्सव मिरवणुकीमध्ये लेझीम संघ, शक्तिप्रयोग सादर करणारे संघ, बहारदार नृत्य सादर करणारे संघ, भजनीमंडळ यांच्यासह बँजोपथक आदींचा सहभाग होता. दर्शन घेण्यासाठी महिला भाविकांची गर्दी होती, तरुणांनी मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा गर्दी केली होती. ही मिरवणूक कन्ना चौक, जोडभावी पेठ, घोंगडे वस्ती, चाटला चौक, कुंभार वेस, कोंतम चौक, भारतीय चौक, जेलरोड पोलीस ठाणे, जमखंडी पूल, साखर पेठ पोलीस चौकी मार्गे पद्मा टॉकीजशेजारील मंदिरात विसर्जित झाली.