सोलापूर - महापालिकेच्या मनाई आदेशास जुमानता लक्ष्मी-विष्णू गिरणीच्या ऐतिहासिक चिमणीचे पाडकाम दुसर्या दिवशीही सुरूच होते. याप्रकरणी सायंकाळी महापालिकेने फौजदारी गुन्हा दाखल केला. ‘इंद्रधनु’चे संचालक विनय वसंत
आपटे, िवकास शंकर कोळी यांच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलिस चौकीत फिर्याद देण्यात आली. पुरातात्विक अवशेष कायदा आणि पुरातात्विक वास्तू जतन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
लक्ष्मी-विष्णू गिरणीच्या जागेवर ‘इंद्रधनु’ नावाने वसाहत उभी केली जात आहे. त्यासाठी ही चिमणी व्यावसायिक पाडत आहेत. पाडकाम रविवारी सुरुवात करण्यात आले. हे लक्षात आल्यानंतर महापालिकेने पाडकाम थांबण्याची नोटीस दिली होती. तरीही सोमवारी पाडकाम सुरूच ठेवले. त्यामुळे अधिकार्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी हस्तक्षेप करत पाडकाम थांबवण्यास सांगितले. मात्र, तोपर्यंत दिवसभरात सुमारे दहा फुटापेक्षा जास्त उंचीचा भाग पाडण्यात आला.
प्राचीनवास्तू कायद्याखाली गुन्हा : प्रभारीनगर अभियंता लक्ष्मण चलवादी यांनी फिर्याद दिली. प्राचीन वास्तू आणि पुरातात्विक स्थल, अवशेष कायदा १९५८ अंतर्गत कल ३० आणि प्राचीन वास्तू आणि जतन कायदा १९०४अंतर्गत कलम १६ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला.
संभाजी आरमारतर्फे सह्यांची मोहीम : लक्ष्मी-विष्णूमिलची चिमणीचे जतन करावे अशी मागणी करीत संभाजी आरमारच्या वतीने सोमवारी सह्यांची मोहीम सुरू केली.
राज्य सरकारकडे प्रलंबित
वारसा समितीसाठी सदस्यांची यादी आणि इमारतीची प्रारूप यादी राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवली आहे. त्याला तीन वर्षे झाली आहेत. त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.” लक्ष्मण चलवादी, प्रभारी नगर अभियंता
पालिकेस अधिकार नाही
आमच्यावर लावलेल्या कलमांचा अधिकार फक्त केंद्र आणि राज्य सरकारला आहे. तो महापालिकेला नाही. पुरातत्त्व विभागाच्या मंजुरीचा उपस्थित केलेला मुद्दा चुकीचा आहे. ऐतिहासिक वास्तूला हे कलम आणि नियम लागू होतात. ‘ही’ वास्तू ऐतिहासिकच नाही. हे कलम लागू होण्याचा प्रश्नच उद््भवत नाही. सोमवारी दिवसभर चिमणीचे पाडकाम सुरू होते. किती पाडकाम झाले हे सांगणे अवघड आहे. पोलिसांनी सायंकाळी पाडकाम थांबविण्यास सांगितले. याला रीतसर, कायद्याच्या चौकटीत उत्तर देऊ. यानंतर पाडकामाबद्दल विचार करू.” - नितीन आपटे, संचालक
पहिल्या छायाचित्रात चिमणीची रविवार सायंकाळची स्थिती. दुसर्या छायाचित्रात सोमवारी सायंकाळची स्थिती. रविवारच्या मनाई नोटीसनंतरही सोमवारी
दिवसभर पाडकाम सुरूच होते. सुमारे दहा फुटांपेक्षा जास्त उंचीचा भाग पाडण्यात आला. पाडकाम करताना कामगार.