सोलापूर - ‘इंद्रधनु’च्याबांधकामाला २३ डिसंेबर २०१४ रोजी परवानगी देताना काही नियम घालून देण्यात आले आहेत. त्या नियमानुसार लक्ष्मी-विष्णू गिरणीच्या चिमणीचे पाडकाम करता येत नाही, असा खुलासा महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी बुधवारी पत्रकारांना दिला.
बांधकामाला मंजुरी देताना "जागेवरील अस्तित्वातील सर्व बांधकामाबाबत वेळोवेळी होणार्या सूचनेचे पालन करण्याची जबाबदारी
आपल्यावर असून सदरची बांधकाम परवानगी मंजूर करत आहोत', असा नियम लावण्यात आला आहे. या नियमानुसार त्यांना चिमणीचे पाडकाम करता येत नाही. तसेच आम्ही केलेल्या सूचनांचे पालन करणे त्यांना बंधनकारक आहेत, असा खुलासा आयुक्तांनी केला.
हेरिटेज कमिटी विषयी ते म्हणाले की, चिमणी पाडू नये असे सोलापूरकरांची इच्छा आहे. ही महापालिका सर्व सोलापूरकरांची आहे. त्यांच्या भावनेचा विचार करावा लागेल. लक्ष्मी-विष्णूची चिमणी हेरिटेज नसली तरी हेरिटेजच्या प्रक्रियेत आहे. हेरिटेज कमिटी स्थापन करण्याकरता, ती प्रक्रिया समजून घेण्याकरता सबंिधत अधिकार्यांना कोल्हापूरला पाठवले आहे.
हेरिटेज नाही : शिवसेना
शहरातभुईकोट किल्ला ही वास्तू सोडली तर कोणतीही वास्तु हेरिटेज नाही. महापालिका चिमणीला कुठल्या अर्थाने हेरिटेज म्हणत आहे. चिमणी जीर्ण झाली असून धोकादायक बनली आहे. त्यामुळे महापालिकेने योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशा आशयाचे निवेदन शिवसेनेने आयुक्तांना दिले.
गय करणार नाही
आयुक्त म्हणाले की, ‘इंद्रधनु’ला नोटीस दिल्यानंतर त्यांनी भेटून चर्चा करायला हवी होती. संबंिधत सर्व अधिकारी, पदाधिकारी यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा केली असती. परंतु महापालिकेचे म्हणणे ऐकून घ्यायचे नाही, अशी त्यांची भूमिका योग्य नाही. वास्तू पाडण्यापूर्वी यावर िनर्णय होणे अत्यावश्यक आहे. पाडल्यानंतर चर्चा करून अर्थ काय? या कामात किंवा कुठल्या कामात कोणाचीही गय करणार नाही. दबावाला पडी पडणार नाही, काम कुठेही करायचेच आहे.