आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

११ मेपर्यंत पाडकाम नको, 'जैसे थे' ठेवण्याचे आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - लक्ष्मी-विष्णू मिलच्या चिमणीचे पाडकाम थांबवून ११ मे पर्यंत "जैसे थे' स्थिती ठेवण्याचे आदेश दिवाणी न्यायाधीश एस. डी. कंकणवाडी यांनी शुक्रवारी (ता. आठ मे) दिला. गेल्या काही दिवसांपासून या "चिमणी'चे पाडकाम "इंद्रधनु'च्या संचालकांकडून होत होते. पाडकाम होत असल्यामुळे महापालिकेने त्यांना प्रथम नोटीस दिली. नंतर फौजदारी दाखल केली. परंतु पाडकाम थांबेना यासाठी न्यायालयात धाव घेतली. तोपर्यंत या "चिमणी'चे बरेच पाडकाम झाले आहे.

"इंद्रधनु'चे रहिवासी आणि संचालक यांच्यातर्फे "चिमणी'ची वास्तू हेरिटेज नाही, हेरिटेज कमिटी स्थापनच नाही, ती "चिमणी' जीर्ण झाली असून महापालिकेकडे पाडकामाची मंजुरी मागण्यात आली परंतु देण्यात आली नाही, आदी अनेक तांत्रिक मुद्दे मांडण्यात आले.

महापालिकेच्या वतीने "चिमणी'ची वास्तू हेरिटेजच्या प्रक्रियेत आहे. ही वास्तू पाडल्यानंतर हेरिटेज जाहीर झाले तर काय करायचे, असा मुद्दा मांडण्यात आला. या युक्तिवादानंतर न्यायालयाने येत्या ११ मे पर्यंत चिमणीची "जैसे थे' परिस्थिती ठेवण्याचा आदेश दिला. याप्रकरणी बंग्लोजवाल्याकडून अ‍ॅड. जी. एच. कुलकर्णी, "इंद्रधनु'चे संचालक आपटे यांच्याकडून अ‍ॅड. आय. बी. पाटील, अ‍ॅड. अतुल कस्तुरे यांनी तर महापालिकेकडून अ‍ॅड. आर. व्ही. दामले यांनी काम पाहिले.

‘चिमणी’ पाडण्यास पालिका जबाबदार असल्याचा आरोप
सन२००७ मध्ये मनपाने लक्ष्मी-विष्णू मिलच्या व्यवस्थापकांना दिलेल्या नोटिशीत ती ‘चिमणी’ ऐतिहासिक असून कायम ठेवा, असे लेखी कळवले होते. त्याबाबतच्या चार नोटिसा पालिकेने संबंधितांना दिल्या होत्या. पण, त्यानंतर काहीच हालाचाली केल्या नाहीत. प्रत्यक्षात ‘चिमणी’ पाडणे सुरू झाल्यानंतर एकाही अधिकार्‍यांनी ठोस भूमिका घेतली नाही. अधिकार्‍यांची भूमिका संशयास्पद असून या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत केली.