आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेच्या चुकांमुळे ‘चिमणी’चे अस्तित्व धोक्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - गिरणगाव अशी आेळख असलेल्या सोलापुरातील लक्ष्मी-विष्णू मिलची चिमणी हा ऐतिहासिक वारसा आहे. शहरातील पुरातन वास्तू जपण्यासाठी महापालिकेच्या भारतीय कला सांस्कृतिक निधी (इंटॅक) संस्थेतर्फे वारंवार महापालिकेला पत्रव्यवहार केले. पण, त्यांच्या दुर्लक्षामुळेच ऐतिहासिक लक्ष्मी- विष्णू मिलची चिमणी पाडण्यास सुरुवात झाली. तो ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी सर्व सोलापूरकरांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन इंटॅकच्या अध्यक्षा सीमंतिनी चाफळकर यांनी केले. लक्ष्मी-विष्णू मिलची चिमणी जतन संवर्धनासाठी इंटॅक तर्फे सोलापूर श्रमिक पत्रकार संघात आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

चाफळकर म्हणाल्या, “कापड गिरण्यांचे स्मरण गिरण्यांच्या स्वरूपात जिवंत ठेवणे आवश्यक आहे. लक्ष्मी मिलची चिमणी अतिशय भक्कम, सुंदर वास्तूकला स्थापत्य शास्त्राचे उदाहरण आहे. सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञाला त्या पद्धतीचे बांधकाम अशक्य आहे. ती ‘चिमणी’ पाडण्याच्या हालचालींची कल्पना चार वर्षांपूर्वी आल्यानंतर त्याबाबत महापालिकेच्या अधिकार्‍यांना कळवले होते. त्यांनी महापालिकेतर्फे ठोस प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते. पण, प्रत्यक्षात काहीच हालाचाली झाल्या नाही, असे याप्रकरातून स्पष्ट झाले.”

त्या म्हणाल्या की, आपटे यांनी ‘चिमणी’ पाडण्याबाबत साठ दिवसांपूर्वी महापालिकेला परवानगी मागितली. पण, त्याबाबत निर्णय घेण्याची चूक महापालिकेची आहे. तसेच, ‘चिमणी’ धोकादायक झाली असल्याचा आपटेंनी महापालिकेत सादर केलेला तज्ज्ञांचा अहवाल चुकीचा आहे. एकाही तज्ज्ञाने घटनास्थळी जाऊन त्याबाबतची पाहणी केली नाही असा दावा त्यांनी केला.

चाफळकर म्हणाल्या की, वास्तविक ती ‘चिमणी’ भक्कम असून त्यास आणखी भक्कमता देऊन तो ऐतिहासिक वारसा जपणे शक्य होते. एेतिहासिक वारसासहित विकास असा दृष्टिकोन आमचा आहे. आपटे समूहाने त्याबाबत सामंजस्याची भूमिका दाखवणे आवश्यक आहे. ऐतिहासिक वारसा जतन-संवर्धनासाठी महापालिकेने हेरिटेज कमिटी स्थापन करणे आवश्यक आहे. ‘चिमणी’सह ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी सर्व सोलापूरकरांनी एकत्रित यावे, असे आवाहन त्यांनी केले.

एकाच व्यासपीठावर यावे
चिमणी’चे संवर्धन व्हावे, अशी भूमिका असणार्‍यांसह, महापालिका आपटे समूह यांनी एकाच व्यासपीठावर यावे. आवश्यक माहिती, कागदपत्रांसह तीनही घटकांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. सर्व सोलापूरकरांसमोर त्याबाबत चर्चा करून सर्वांच्या उपस्थितीत सार्वजनिक हिताचा निर्णय घेऊन त्याबाबतची कृती करुयात. यासाठी सर्वांनी एकाच व्यासपीठावार यावे किंवा त्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी मागणी श्रीमती चाफळकर आर्किटेक्ट पुष्पांजली काटीकर, प्रा. नरेंद्र काटीकर यांनी केली.
बातम्या आणखी आहेत...