आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाव्याचा निकाल होईपर्यंत "चिमणी'चे पाडकाम थांबवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - लक्ष्मी-विष्णू गिरणीच्या जागेवरील चिमणी महापालिकेच्या प्रस्तावित हेरिटेज यादीत आहे. त्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला. त्याचा निर्णय होईपर्यंत चिमणी पाडू नये, अशा महापालिकेच्या मागणी अर्जावर जिल्हा न्यायालयात गुरुवारी सुनावणी झाली. त्यावर सहदिवाणी न्यायाधीश एस. एस. पानसरे यांनी दाव्याचा निकाल होईपर्यंत "चिमणी'चे पाडकाम करू नये, असे आदेश दिले. हा आदेश दिल्याच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आत महापालिका आणि चिमणी पाडणार्‍यांनी पुरावे सादर करण्याची सूचनाही त्यांनी केली.

भय्या चाैकातील विसर्जित लक्ष्मी-विष्णू गिरणीच्या जागेवरील चिमणी पाडण्याचे काम ‘इंद्रधनु’ या गृहनिर्माण प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक नितीन आपटे यांनी सुरू केले होते. २४० फूट उंच असलेल्या या चिमणीचा बराचसा भाग पाडल्यानंतर महापालिकेने जिल्हा न्यायालयात धाव घेतली. "चिमणी' प्रस्तावित हेरिटेजच्या यादीत असल्याने ती पाडता येणार नाही, असा दावा महापालिकेने केला. त्यावर न्यायाधीश पानसरे यांनी पहिल्यांदा दोन दिवसांची स्थगिती दिली. त्यानंतर गुरुवारी सुनावणी झाली. तीत मूळ दाव्याचा निकाल होईपर्यंत "चिमणी' पाडू नये, म्हटले आहे. महापालिकेच्या वतीने अ‍ॅड. रघुनाथ दामले, अ‍ॅड. प्रदीप चलवादी तर आपटे यांच्या वतीने अ‍ॅड. इंद्रजित पाटील, अ‍ॅड. अतुल कस्तुरे, फ्लॅटधारकांतर्फे जी. एच. कुलकर्णी यांनी काम पाहिले.
बातम्या आणखी आहेत...