आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Land And Property Related Collection Start : Assistand Commissioner

भूमी व मालमत्ता अपहारप्रकरणीतील 15 जणांकडून रक्कम वसूल करा : सहाय्यक आयुक्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महापालिकेतील भूमी व मालमत्ता विभागातील 92 लाख 80 हजार रुपयांच्या अपहारप्रकरणी चौकशी अधिकारी व्ही. सी. हंगे यांच्या अहवालावर कारवाई करण्याबाबत निर्णय घेण्यास मनपाला एक वर्षाचा कालावधी लागला आहे. साहाय्यक आयुक्त अजित खंदारे यांच्या पत्रावरून मनपा आयुक्तांनी दोषी 15 जणांकडून अपहारित रकमा वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. फौजदारी कारवाई मात्र अजूनही झालेली नाही.

महापालिकेच्या तत्कालीन आयुक्तांनी भंडे घोटाळाप्रकरणी सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे. मनपाच्या विभागीय चौकशीचा अहवाल र्शी. हंगे यांनी फेब्र्रुवारी 2012 मध्ये आयुक्तांकडे सादर केला होता. हंगे यांनी 23 जणांची चौकशी करून त्यापैकी 15 जणांना दोषी ठरवले होते. सहा जणांवरील आरोप सिद्ध झाले नाहीत. एकास अंशत: दोषी ठरवण्यात आले आहे.

दोषींवर प्रशासकीय कारवाई करावी, असा प्रस्ताव प्रशासकीय कार्यालयाने ठेवला असून, त्यास आयुक्तांनी मान्यता दिली आहे.

15 जणांपैकी वरिष्ठ मुख्य लेखनिक आर. व्ही. तरकसबंद आणि कनिष्ठ र्शेणी लिपिक आर. जी. सगरी हे मनपा सेवेत आहेत. अन्य 13 जण सेवानिवृत्त झाले आहेत.
विभागीय चौकशीत दोषी

जे. डी. भंडे, लक्ष्मण सिद्राम जाधव, नंदकुमार खंडप्पा शिवशरण, र्शीराम बाजीराव लबडे, रमेश र्शीधर काटकर, अशोक एस. पवार, सरस्वती मनोहर जाधव, सुभाष रतन बद्दूरकर, जालिंदर तुकाराम शिंदे, बबन शामराव डोंगरे, अ. सत्तार शहाबुद्दीन शेख, एस. एम. दंडू, आर. व्ही. तरकसबंद, एस. पी. दळवी, आर.जी. सगरी.
आरोपातून वगळले

नीलम नीलकंठ हल्याळकर, उमाकांत र्शीशैल मुनोळी, बळवंत गोविंद अहंकारी, विवेक पुरुषोत्तम कुंभारे, विठ्ठल व्यंकटेश वल्लमदेशी, शरद अनंत बदरायणी यांना विभागीय चौकशी अधिकर्‍यांनी निदरेष ठरवले आहे. सिद्राम म्हेत्रे यांची चौकशी सुरू आहे. कमल सुधाकर मिरजकर यांना अंशता दोषी ठरवले आहे.
भंडे घोटाळाप्रकरणी दोषीविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार ते नेमके किती रकमेस जबाबदार आहेत, त्यानुसार त्यांच्या देय रकमांवर कारवाई करण्यात येणार आहे. रकमेची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे.’’ अजित खंदारे, साहाय्यक आयुक्त, प्रशासन, मनपा