आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज डेपो उभारणीसाठी २२ हेक्टर जागा उपलब्ध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महावितरणकडून डेपो उभारणीसाठी निधी मंजूर असूनही जागा उपलब्ध नसल्याने जिल्ह्यातील अनेक गावात डेपो उभारण्यात अडचण येत होती. जिल्हाधिकारी कार्यालयाने यासाठी २२ हेक्टर ५८ आर शासकीय जागा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी महावितरणने कोटी १४ लाख रुपये जिल्हाधिकारी कार्यालयास भरले आहेत. यामध्ये बार्शी तालुक्यात वनविभाग माळशिरस तालुक्यात न्यायालय उभारणीसाठी जागा दिली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाने शासकीय कामांसाठी किती जागा लागणार आहे, याची माहिती मागविली होती, प्राधान्यानुसार २०१४ २०१५ या वर्षामध्ये महावितरण, न्यायालय वनविभागाला जागा उपलब्ध करून दिली आहे. सांगोला तालुक्यातील चिकमहूद, सोनंद, करांडेवाडी, माळशिरस तालुक्यातील माळशिरस, दसूर, माढा तालुक्यातील निमगाव, जामगाव, बारलोणी, तांदुळवाडी, उपळाई बु., टाकळी टे., सापटणे, भेंड, मिटकलवाडी, बार्शी तालुक्यातील पिंपरी, बावी, उपळाई ठों., पाथरी, बार्शी, करमाळा तालुक्यातील कात्रज, हिंगणी, जातेगाव, दक्षिण सोलापूर - निंबर्गी, इंगळगी, मंगळवेढा- ढवळस तर मोहोळ - शेटफळ याठिकाणी जागा उपलब्ध केली आहे.

लवकरच जागा देणार
गेल्या वर्षभरात जागेअभावी बंद असलेल्या योजनांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये प्राधान्यक्रमानुसार जागा देण्याची मोहीम हाती घेण्यात आली. यामध्ये महावितरणचे डेपो उभारणीच अर्ज अधिक हाेते. त्यानुसार जिल्ह्यातील २५ ठिकाणी महावितरणला, बार्शी येथे उपवनसंरक्षक कार्यालयास तर माळशिरस न्यायालयास जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये १५ प्रकरणे नामंजूर करण्यात आली तर आणखी योजनांसाठी लवकरच जागा देण्यात येणार असल्याचे निवासी उप जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी सांगितले.