आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात बनावट प्लॉट विकून केली फसवणूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- तळेहिप्परगा येथील सिध्देश्वर हौसिंग सोसायटीत अस्तित्वात नसलेल्या प्लॉटची बनावट कागदपत्रे तयार करून तो बारा लाख रुपयांना विकून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी ग्रामसेवकासह सात जणांवर सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुनंदा चक्रवीर महिंद्रकर (वय 43, रा. रेणुका नगर, विडी घरकुल)यांनी फिर्याद दिली आहे.
मौजे तळेहिप्परगा सिध्देश्वर हौसिंग सोसायटी प्लॉट नं.27 हा प्लॉट अस्तित्वात नसताना बंदपट्टे या महिला ग्रामसेवकाची मदत घेऊन बालाजी यलप्पा पवार यांच्या नावे बनावट उतारा करून घेण्यात आला. यानंतर स्वत: मालक असल्याचे भासवून दुय्यम निबंधक वर्ग 2 उत्तर कार्यालयामध्ये खरेदी खत दस्त क्रमांक 4413/2010/ दि. 24-05-2010 रोजी बनावट खरेदी खत करून बारा लाख रुपयांस महिंद्रकर यांना विकण्यात आला. या प्रकरणी अमोल औदुंबर तांबे, रागिणी अमोल तांबे, आशाबाई औदुंबर तांबे, अनिल औदुंबर तांबे, बालाजी यलप्पा पवार, र्शीमती बंदपट्टे (सर्व रा. तळे हिप्परगा), सत्यनारायण अंबाजी सोमा (जुना बोरामणी नाका) या सात जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
धमकी दिली, तिघांवर गुन्हा
नळ तोडल्याच्या कारणावरून तिघांनी एकास मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी तिरुमल वसंत घोडके यांनी जेलरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शुक्रवारी घोडके यांना पाण्याचा नळ का तोडला म्हणून प्रशांत घोडके, प्रमोद घोडके, उदय घोडके यांनी लाथा बुक्याने मारहाण करून खिशातील 350 रुपये काढून घेतले आणि जिवे मारण्याची धमकी दिली.
‘मटकामुक्त सोलापूर’ हे अभियान ‘दिव्य मराठी’ने 26 सप्टेंबरपासून सुरू केले. शहरात राजरोस मटका सुरू असल्याचे पोलिस आयुक्तांना माहीतच नव्हते. ‘दिव्य मराठी’च्या वृत्ताची दखल पोलिस आयुक्तांनी घेतली. त्यानंतर त्यांनी संबंधित पोलिस अधिकार्‍यांना चांगलेच सुनावले आणि नोटिसाही बजावल्या होत्या. आयुक्तांनी हजेरी घेताच सर्व पोलिस ठाणे आणि विशेष गुन्हे शाखेमार्फत जोरात कारवाई सुरू झाली आणि खुलेआम मटका पूर्णपणे बंद करण्यात आला. मात्र, दिवाळी सुटीनंतर पुन्हा मटका जोर धरत आहे.