आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माळढोकसाठी जमीन संपादन प्रक्रियेस प्रारंभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तर सोलापूर- उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज माळढोक पक्षी अभयारण्यासाठी नान्नज, अकोलेकाटी, नरोटेवाडी या शिवारातील ९६.३३ हेक्टर जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू आहे.
३० डिसेंबर २०१३ मध्ये मार्डी शिवारातील ३८३ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. यावेळी या ३८३ हेक्टर जमीन साठी १० कोटी रुपये इतके खर्च झाले होते. सध्या नान्नज येथील ३५.२३ हेक्टर, अकोलेकाटी येथील २१.७७ हेक्टर, नरोटेवाडी येथील ३९.३३ हेक्टर अशी एकूण ९६.३३ हेक्टर जमीन संपादनासाठी तब्बल कोटी २० लाख रुपये तरतूद आहे. डिसेंबर २०१३ मध्ये ३८३ हेक्टर जमिनीसाठी लाख ८९ लाख ५०० तर काही जमिनींसाठी लाख २१ हजार ५०० रुपये इतका एकरी दर शेतक-यांना देण्यात आला.

गेल्या १३ महिन्यात जमिनीचे दर वाढत राहिल्याने सध्या ९६.३३ हेक्टर जमिनीसाठी एकरी लाख ६० हजार या प्रमाणे मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या तेरा महिन्यात चौपट दर देऊन माळढोक पक्षी अभयारण्यासाठी जमीन संपादित करण्यात येत आहे. असे सांगण्यात आले.

रस्त्याची दुरवस्था
नान्नजमाळढोक अभयारण्याकडे नान्नजपासून जाणारा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. पर्यटकांना रस्त्यावरील खड्ड्यातून मार्ग काढत अभयारण्यात जावे लागते. त्याच रस्त्यावर उघड्या गटारी, सांडपाण्याचे डबके कचरा पडल्याने दुर्गंधी, अस्वच्छता आहे.

गुरे प्रतिबंध चर
अभयारण्यातीलसंरक्षित क्षेत्रात परिसरातील मोकाट जनावरे चरण्यासाठी येतात. ते थांबविण्यासाठी मार्डी, नान्नज, कारंबा या अभयारण्याच्या परिक्षेत्रातील रस्त्यालगत मोठी चर खोदण्यात आली. तसेच, अभयारण्यात पक्षी निरीक्षकांसाठी मार्डी शिवारात ३५ फूट उंच मनोरा उभारण्याचे काम सुरू आहे.

जाळरेषेचे काम सुरू
अभयारण्यासाठीआवश्यक जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. मोकाट जनावरांना अटकाव करण्यासाठी रस्त्याच्या लगत चर खोदली आहे. तसेच, आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी जाळरेषा घेण्याचे काम सुरू आहे. पर्यटकांना निरीक्षणासाठी रस्त्याच्या वॉच टॉवर उभारलेत. आर.एन. कुलकर्णी, वनपरिक्षेत्र अधिकारी, नान्नज