आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक जूनपासून होणार भूमी अभिलेख कार्यालये ऑनलाइन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगोला (सोलापूर) - राज्यात राष्‍ट्रीय भूमी अभिलेख कार्यक्रम दीड वर्षापासून राबवला जात आहे. आता ऑनलाइन सुविधेद्वारे 1 जूनपासून राज्यातील सर्व भूमी अभिलेख कार्यालये संगणकाद्वारे जोडली जाणार असल्याची माहिती जमाबंदी आयुक्त व संचालक चंद्रकांत दळवी यांनी दिली.

राज्यातील जमीनविषयक अवस्था समजून त्यासंबंधीच्या उपाययोजना शोधणे, जमीनविषयक धोरणात्मक योग्य बदल सुचवणे, लोकांमध्ये जाणीव-जागृती निर्माण करणे, या उद्देशाने ग्रामपीठ चळवळीच्या वतीने पहिली राज्य भूमी परिषद सांगोला येथील अहिल्या सभागृहात आज झाली. त्या वेळी दळवी बोलत होते. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख अध्यक्षस्थानी होते. शेकाप नेते प्रा. एन.डी. पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी, आमदार दीपक साळुंखे, मुख्य प्रवर्तक प्रफुल्ल कदम आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. दळवी म्हणाले की, ‘‘राज्यातील भूमी अभिलेख, सातबारा, प्रॉपर्टी कार्ड, नोंदी, जमिनीचा मोजणी कायदा लिखित स्वरूपाचा चालत आहे. काळ बदलत चालला आहे. संगणकाचा वापर सुरू झाला आहे. हे लक्षात घेऊनच आम्ही बदलत आहोत.