आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केटरिंग कॉलेजचा भूखंड शासनाच्या मालकीचा, जिल्हाधिकाऱ्यांचा सचिवांकडे दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जुनेसोलापूर भागातील केटरिंग कॉलेजसह १६ हेक्टर ५४ आर भूखंडाच्या मालकी हक्कावरून रेल्वे महसूल प्रशासनात वाद सुरू आहे. याप्रकरणी महसूल प्रधान सचिव श्री. संधू यांनी संबंधित कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांंकडून डिसेंबर रोजी म्हणणे एेकून घेतले आहे. जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी संबंधित भूखंड राज्य शासनाच्या मालकीचा असल्याचा दावा केला आहे. याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. जुळे सोलापुरातील १९२८ मध्ये गट क्रमांक १६० हा १६ हेक्टर ५४ आर इतके क्षेत्र मीटरगेज रेल्वेसाठी संपादित केले होते.
मीटरगेज बंद झाल्यानंतर अनेक वर्षे ही जमीन वापरात नसल्याचे निदर्शनास आले. यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी के. गोविंदराज यांनी २००७ मध्ये ही जमीन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हस्तांतरण करून घेतली. २००९ मध्ये त्यापैकी एकर भूखंड पर्यटन विकास महामंडळाच्या केटरिंग कॉलेजसाठी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी दिला. भूखंड विल्हेवाट लावण्यापूर्वी ज्याच्याकडून भूसंपादन केले, त्याचे म्हणणे विचारात घेणे न्यायालयीन निर्देशानुसार क्रमप्राप्त आहे. महसूल प्रशासनाने रेल्वेच्या ताब्यात असलेला भूखंड परस्पर ताब्यात घेऊन पर्यटन महामंडळास दिल्याचे समोर येत आहे.
-जुळे सोलापुरातील मीटरगेजची १६ हेक्टर ५४ आर इतकी जमीन रेल्वेने परत मागितली आहे, याबाबत आम्ही आमचे म्हणणे शासनाकडे मांडले आहे. याबाबत वरिष्ठ निर्णय घेतील.'' तुकाराममुंढे, जिल्हाधिकारी.