आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वधर्मीयांच्या उपस्थितीत लंगरचा कार्यक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सेवा आणि प्रेमाचा संदेश देणारे गुरुनानक देव यांची 545 वी जयंती सोलापुरात मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त तेरा दिवस चाललेल्या धार्मिक कार्यक्रमांचा समारोप रविवारी करण्यात आला. अंत्रोळीकरनगरातील गुरुव्दार येथे सकाळपासून गर्दी होती. तसेच सर्वधर्मीयांनी लंगरच्या (महाप्रसाद) कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

रविवारी पहाटे पाच वाचता प्रभातफेरी काढण्यात आली. नवजीवननगर, गुरुनानकनगर, अंत्रोळीकरनगर आदी भागांतून ही प्रभातफेरी काढण्यात आली. सकाळी 7 वाजता गुरुद्वार येथे वीर मनेंद्रपाल सिंगजी (रोकड पंजाब) यांनी गुरुनानक देवजी यांचे आयुष्य आणि त्यांच्या विचारांबाबत मार्गदर्शन केले आणि गुरुनानक देवजी यांचे विचार आचरणात आणण्याचे आवाहन केले.

सकाळी दहानंतर कीर्तन, प्रवचन, भजन आदी कार्यक्रम घेण्यात आले. होशीयारपूर येथील बीबी हरजीत कौर यांनी कथा कीर्तन केले. रात्री दीड वाजेपर्यंत धार्मिक कार्यक्रमांचा समारोप झाला.

अशी आहे लंगर (महाप्रसाद)ची परंपरा
गुरुनानक देव जयंतीनिमित्त 5 नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमांचा आज समारोप झाला. रविवारी तीन सत्रात कार्यक्रम झाले. प्रत्येक सत्रात लंगरचे आयोजन करण्यात आले होते. गुरुद्वारामधून कोणीही उपाशी पोटू परत जाऊ नये, अशी धर्माची परंपरा आहे. त्यानुसार गुरुद्वारात लंगरचे आयोजन करण्यात येते. सिंधी समाजबांधवांसह सर्वांनी याचा लाभ घेतला.

सिंधी समाजाने घेतले परिश्रम
तिन्ही सत्रात लंगर (महाप्रसाद) वाटप करण्यात आला. या लंगरचा लाभ सर्वधर्मीय बांधवांनी घेतला. यावेळी सरदार रमेश सिंगजी, रवींद्र सिंगजी, प्रदीप सिंगजी, कमलाजित सिंगजी, कपिल नानकानी, कुमार गुदलानी, अमर सचदेव, राजू धानेजा, मनोज रोडा, रोशन मुरजानी, अजय मुनियाल, अजय परयानी, नरेश सचदेव, मनीष माखेजा, सूरज मुरजानी, प्रकाश तोलानी, भावेश साखरानी, दीपक गुदलानी आदींसह सिंधी समाजबांधवांनी पर्शिम घेतले.