आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lanner Doctor Is Very Under Pressure Issue At Solapur

पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरांमध्ये वाढतोय तणाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - अडचणींचासामना करत वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कामाचे निश्चित तास नाहीत. स्वत:च्या लग्नासाठीही रजा मिळत नाही. चांगले जेवण नाही, सुविधांनीयुक्त स्वच्छतागृहे नाहीत. अशा अवस्थेत शारीरिक आणि मानसिक ताण येणारच. त्यांना समजून घेणारी यंत्रणाच नसेल तर त्यांची घुसमट होते. त्यातून आत्महत्यांचे प्रकार होतात. त्याला रोखायचे असेल तर अशा विद्यार्थ्यांचे समुपदेशन व्हायला पाहिजे. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत. योग्य त्या सुविधाही दिल्या पाहिजेत. पदव्युत्तर शिक्षण घेताना आम्ही या अडचणींचा सामना केलेलाच आहे. अजूनही त्यात काही बदल होत नसतील तर सरकारी वैद्यकीय महाविद्यालये बंद पडतील. हुशार मुले वैद्यकीय शिक्षण घेणारच नाहीत, अशी मते येथील नामवंत डॉक्टर मंडळींनी मंगळवारी व्यक्त केली.
डॉ. व्ही. एन. वैशंपायन स्मृती वैद्यकीय महािवद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या डॉ. किरण जाधव यांनी गेल्या आठवड्यात आत्महत्या केली. वरिष्ठांच्या त्रासामुळे हे कृत्य करत असल्याचे त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. त्यानुसार शासकीय रुग्णालयातील चार डॉक्टरांच्या विरोधात पोिलसांनी गुन्हा दाखल केला. यासंबंधी सोलापुरातील डॉक्टरांना काय वाटते, हे जाणून घेण्यासाठी 'दिव्य मराठी’ कार्यालयात चर्चा झाली. त्यात १४ जणांनी सहभाग नोंदवला. स्वत: पदव्युत्तर शिक्षण घेताना काय अनुभव होते आणि आताची स्थिती कशी आहे, यावर त्यांनी प्रकाश टाकला. ‘आम्ही या तणावातून गेलोय, पण स्थिती बदलणार कधी?’ अशी विचारणा त्यांनी केली.
या आहेत अडचणी
१. विद्यार्थी आणि खाटांचे प्रमाण व्यस्त
२. तब्बल चोवीस तास द्यावी लागते सेवा
३. वसतिगृह, खानावळींत सुविधा नाहीत
४. कर्मचाऱ्यांचा अभाव