आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात अॅडव्हान्स लॅप्रोस्कोपीची दारे उघडली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया (लॅप्रोस्कोपी) करण्याच्या तंत्राने येत्या दशकात शस्त्रक्रियेच्या क्षेत्रात क्रांतिकारक बदल होणार आहेत. सोलापुरात आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेमुळे येथे अॅडव्हान्स लॅप्रोस्कोपीची दारे उघडली आहेत, असे प्रतिपादन भारतातील पहिले लॅप्रोस्कोपी सर्जन आणि असोसिएशन ऑफ मिनिमल अॅक्सेस ऑफ इंडियाचे (अमासी) संस्थापक अध्यक्ष डॉ. पेलानिवेलू यांनी केले. या तंत्रासाठी लागणारी उपकरणे खूप महाग आहेत. ती सहज उपलब्ध झाली पाहिजेत आणि वैद्यकीय शिक्षणात त्यांचा समावेश झाला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यशोधरा सुपरस्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये लॅप्रोस्कोपीवरील तीन दिवसांची राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यशाळा झाली. व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे डॉ. पेलानिवेलू यांनी मार्गदर्शन केले. डॉ. पेलानिवेलू हे प्रशिक्षणातून लॅप्रोस्कोपी तंत्राचा प्रसार करतात. अमासीचे आज देशात सहा हजार डॉक्टर सदस्य आहेत. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरल्याची प्रतिक्रिया कार्यशाळेत सहभागी झालेल्या अनेक डॉक्टरांनी व्यक्त केली.
- सोलापुरात अॅडव्हान्स लॅप्रोस्कोपीचे तंत्र रुजायला याची मोठी मदत होईल. २५-२५ वर्षे या क्षेत्रात असलेेल्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. त्यांचे अनुभव, त्यांच्या हातून झालेल्या चुकाही खूप शिकवून गेल्या. येथे केवळ शिकवले गेले नाही तर प्रॅक्टिस आणि थेरीही झाली. अनेकांचे रिव्हिजनही झाले.
डॉ. विजय कानेटकर
- लॅप्रोस्कोपीचे प्रशिक्षण घेणे हे अतिशय खर्चिक असते. त्यासाठीची उपकरणे मिळवणे ही एकट्या दुकट्याचे काम नाही. अॅडव्हान्स लॅप्रोस्कोपीला चालना मिळावी. ज्ञानाची देवाण-घेवाण व्हावी. तिघे चौघे डॉक्टर्स एकत्र येऊन या क्षेत्रात पुढे यावेत, त्यांना चालना मिळावी हाच उद्देश या आयोजनामागे होता.
डॉ. विजय शिवपुजे, संयोजक
बातम्या आणखी आहेत...