आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातपंप, लॅपटॉप व सायकल वाटपाच्या विषयावरून गोंधळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जिल्ह्यात बंद असलेले हातपंप, विहिरीतील गाळ काढणे, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लॅपटॉप व सायकल वाटप आदींबाबत जिल्हा परिषदेची विशेष सभा गाजली. जिल्ह्यामध्ये असलेली दुष्काळी परिस्थिती आणि पाणीपुरवठ्याचे नियोजन या विषयांवर चर्चा आणि नियोजन करण्यासाठी ती बोलावली होती. त्रुटी काढत काही विषयांना सदस्यांनी विरोध केला.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी अध्यक्षस्थानी होत्या. उपाध्यक्ष सुभाष गुळवे, शिक्षण मंडळ सभापती शिवानंद पाटील, महिला व बालकल्याण सभापती जयमाला गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश काकाणी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डुबे, उपमुख्यकार्यकारी प्रभू जाधव आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील १० तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले आहेत. त्यात सांगोल्याचे नाव का घेतले नाही, अशी विचारणा करत सदस्यांनी धारेवर धरले. धैर्यशील मोहिते व संजय पाटील यांनी िनकृष्ठदर्जाचे सौरदिवे पुरवणाऱ्याचे नाव काळ्या यादीत टाकावे आिण गरज असेल तेथेच दिवे द्यावेत तसेच सौरदवि्यांवर खर्च करण्यापेक्षा तो निधी वीज बिल भरण्यासाठी वर्ग करता येतो का? ते पहावे अशी सूचना केली.

श्री. काकाणी यांनी पाणीटंचाई दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. सध्या धरणात ५३ टक्के पाणीसाठा आहे. पावसाळाअखेर तो २७ टक्के असेल. त्यामुळे परतीच्या पावसाकडे लक्ष आहे. तसेच टंचाई कामांसाठी सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. यासाठी दीर्घकालीन आणि तात्पुरत्या उपाययोजनांची आखणी होत असल्याचे म्हणाले.

सदस्यांनी घातला गोंधळ
सदस्य संजय पाटील, धैर्यशील मोहिते, अॅड. सुकेशनी देशमुख, उमाकांत राठोड, विरोधी पक्षनेते महिबूब मुल्ला, यांनी विद्यार्थ्यांना देण्यात आलेले लॅपटॉप हे निकृष्ठ दर्जाचे असल्याचा आरोप करत गोंधळ घातला. धैर्यशील मोहिते यांनी तर सभागृहात लॅपटॉप मागवा असा आग्रह धरला. पण शेवटपर्यंत लॅपटॉप आलाच नाही.
या विषयांवरून वादंग
हातपंपाची खोदाई ३०० ते ५०० फुटांपर्यंत करण्यात यावी.
प्लास्टिकचे १५ पाइप टाकून पाणी खेचता येते का? ते पहावे.
कोल्हापूर व इतर बंधारे भरून घ्यावेत.
बंधाऱ्यांच्या दरवाजाची उंची वाढवावी.
किमान एक तासभर तरी वीजपुरवठा सुरू ठेवावा.
तांत्रिकपदे भरता आली नाही तर कंत्राटी पद्धतीने हातपंपाची कामे करून घ्यावीत
चांगल्या दर्जाचे सौरदिवे घ्यावेत आिण गरज असेल तेथेच द्यावेत.
साहेब थट्टा करू नका
संसारोपयोगी भांडी अजून आली नाहीत, गॅसचे काय झाले? असे संजय पाटील यांनी पदाधिकार्‍यांना विचारले तेव्हा काहींनी थट्टेत उत्तर दिले. तेव्हा पाटील यांनी, साहेब टिंगल करून नका, मी शासकीय भाषेत बोलत आहे. आपण तसेच बोलावे आिण आपल्यासमोर भगिनी आहेत हे विसरू नका असे सुनावले.
सायकल "कोहिनूर'ची का?
काही सदस्यांनी मागील दोन वर्षांत मंजूर झालेल्याच सायकली अजून मिळाल्या नाहीत, यावर्षीच्या कधी मिळणार? असे विचारत यादीत अॅटलस, हिरो अशा सायकली ऐवजी कुठल्या तरी कोिहनूर कंपनीच्या सायकली का देता? असा सवालही केला.
पारदर्शी काम केले आहे
^लॅपटॉपसाठी िनविदा मागवल्या होत्या. त्याद्वारेच खरेदी झाली. नवििदेत नोंदवल्याप्रमाणे त्याची रचना नसेल तर चौकशी करण्यात येईल. स्वतंत्र चौकशी करून पुरवठादारास काळ्या यादीत टाकण्यात येईल. आम्ही काहीही केलेले नाही. पूर्णपणे पारदर्शी काम झाले आहे.”
शिवाजी कांबळे, सभापती, समाजकल्याण विभाग
मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणतात...
विहिरीतील गाळ काढून त्याचा पुनर्वापर करण्याचा विचार असून तसे नियोजन केले आहे. दुष्काळी परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी २२ कोटी ४३ लाखांची पाणीपुरवठा योजना असून त्याची लवकरच अंमलबजावणी होणार आहे. विहिरीतील गाळ काढण्यासाठी ६ काेटी रुपयांचा निधी असून त्यातील आपल्यासाठी ३ कोटी मिळतील. लॅपटॉपप्रकरणी काही घोळ झाला असे वाटत असेल तर पुरवठाधारकाची चौकशी करून त्याचे नाव काळ्या यादीत टाकण्यात येईल.