आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आबांच्या पार्थिवावर अंजनीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, मुलाने दिला मुखाग्नी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - सर्वांचे लाडके आबा म्हणजेच आर. आर. पाटील यांच्या पार्थिवावर त्यांच्या जन्मगावी अंजनी येथे हेलिपॅड मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यांच्या मुलाने पार्थिवाला मुखाग्नी दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह राज्यातील सर्वच पक्षांचे प्रमुख नेते यावेळी त्यांच्या अंत्य संस्कारासाठी उपस्थित होते.
फोटो - आर आर पाटील यांच्या दोन मुली आणि लहान मुलगा.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांनी आर आर पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली. अण्णा हजारे यांनी आबांच्या जाण्याने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले असल्याचे म्हटले आहे. आबांच्या रुपाने आपण राजकारणातील एक पवित्र व्यक्तिमत्त्व गमावले असल्याचे अण्णा म्हणाले. राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांचीही उपस्थिती असेल. माजी मंत्री छगन भुजबळ, नारायण राणे, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, पतंगराव कदम, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील या नेत्यांचीही याठिकाणी उपस्थिती आहे.
अंजनी येथे आर.आर.पाटील यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले असून, त्याठिकाणी मान्यवर आबांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आबांना श्रद्धाजंली अर्पण केली.

सकाळी सुमारे 7.30 च्या सुमारास आबांचे पार्थिव तासगावात दाखल झाले. तासगावातील प्रमुख चौकातून आबांच्या अंत्ययात्रेला अंत्ययात्रेला सुरुवात झाली. भिलवडी नाका चौकातून निघालेली ही यात्रा सिद्धेश्वर मंदिर, गणपती मंदिर आणि विटा नाका मार्गे मार्केटयार्ड येथील मैदानात आबांचे पार्थिव आले. त्यानंतर त्यांचे पार्थिव अंजनीत दाखल झाले.
याठिकाणी सकाळपासूनच अंत्यदर्शनासाठी कार्यकर्त्यांची रांग लागली होती. याठिकाणी अनेक महत्ताचे नेतेही आबांच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते. त्यासाठी कडक सुरक्षेसर खास व्यवस्था करण्यात आली होती.
एक दिवसाचा शासकीय दुखवटा
राज्याचे माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या दुःखद निधनामुळे राज्य शासनाने एक दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. तसेच मंत्रालयावरील राष्ट्रध्वजही अर्ध्यावर खाली उतरवण्यात आलेला आहे.
पुढील स्लाईडवर बघा, आर. आर. पाटील यांच्या अंत्ययात्रेचे आणि अंत्यसंस्काराचे फोटो....खासदार सुप्रिया सुळे यांनी आबांच्या मुलांना दिला आधार...