आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंजनीत लाेटला जनसागर: आबा पंचत्वात विलीन; ‘आमच्या वाट्याला पुन्हा दुष्काळ’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंजनी (जि. सांगली)- ‘आबांनी स्वत:साठी नाही; आमच्यासाठी, राज्यातल्या जनतेसाठी तरी आजाराकडे दुर्लक्ष करायला नको होते. आत्ता कुठे त्यांनी आम्हा दुष्काळग्रस्तांच्या आयुष्यात आशेची पालवी जागवली होती. आता आमच्या वाट्याला पुन्हा ‘दुष्काळच’’, ही प्रतिक्रिया होती दिवंगत अार.अार. पाटील यांच्यावर निस्सीम प्रेम करणा-या चाहत्यांची. आबांच्या अंत्यविधीला आलेला प्रत्येक जण हळहळत होता. ‘आबांचे हे काही जाण्याचे वय नव्हते’ म्हणत अश्रूंना वाट करून देत होता. ‘अापला माणूस’ गमावल्याची भावनाच प्रत्येकाच्या ताेंडी हाेती.
मंगळवारी सकाळी आबांचे पार्थिव तासगावात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यानंतर आबांनी जिल्हा परिषदेची पहिली निवडणूक लढवलेल्या सावळज या गावी पार्थिव नेण्यात आले. येथून अंत्ययात्रा अंजनी गावी नेण्यात आली. गावातील आर. आर. पाटील महाविद्यालयाच्या पटांगणावर अंत्यविधीसाठी चबुतरा उभारण्यात आला होता. तेथेही अलाेट गर्दी जमली हाेती. सांगलीसह सोलापूर, कोल्हापूर, सातारा, पुणे, मुंबई, ठाणे, मराठवाडा आणि शेजारच्या कर्नाटकातून आबांच्या चाहत्यांचे जत्थे सकाळपासूनच दाखल हाेत हाेते. पोलिसांनी दोन किलाेमीटर अंतरावर वाहने लावण्याची व्यवस्था केली होती. तरीही भर उन्हात लोक आपल्या लाडक्या नेत्याचे अंत्यदर्शन घेण्यासाठी चालत येत होते.

अंत्ययात्रेत ‘अमर रहे अमर रहे’च्या घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांनाही शोक अनावर झाला होता. प्रचंड ऊन तापले असतानाही लोक आपल्या लाडक्या नेत्याचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी उभेच होते. आपल्या घरचाच करता माणूस गेल्याचे दु:ख होऊन महिला धाय मोकलून रडत होत्या. अंत्यविधीच्या ठिकाणी व गाड्यांवर ‘अापला माणूस हरपला’ असे पाेस्टर्स लावण्यात अाले हाेते. शोकसागरात बुडालेल्या लाखोंच्या जनसागराने आबांना अखेरचा निरोप दिला.

मुलींनीही दिला मंत्राग्नी
पोलिसांनी बंदुकीच्या फैरींची सलामी दिल्यानंतर अाबांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पत्नी सुमन, मुलगी स्मिता, सुप्रिया, खासदार सुप्रिया सुळे यांनी पार्थिवाचे शेवटचे औक्षण केले. त्यानंतर मुलगा रोहित व मुलींनी पार्थिवाला मंत्राग्नी दिला.
आईला वाईट वाटेल म्हणून...
आपल्याला कर्करोग झाल्याचे अाबांना विधानसभा निवडणुकीपूर्वीच माहीत झाले होते. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार घेत असताना माजी मंत्री जयंत पाटील त्यांची विचारपूस करायला गेले असता त्यांनी ‘आधीच का सांगितले नाही?’असे विचारले असता आबांनी ‘आईला समजले तर तिला वाईट वाटेल म्हणून मी कोणालाच बोललो नाही’ असे सांगितले. जयंत पाटील यांनी ही अाठवण शोकसभेत सांगितल्यावर सर्वच उपस्थित हळहळले.
पुढील स्‍लाईडवर वाचा, खासदार सुप्रिया सुळेंनी दिला आर. आर. पाटील यांच्या मुलांना आधार...