आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रावणातील शेवटचा सोमवार रथोत्सवांचा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - श्रावणातील शेवटचा सोमवार रथोत्सवांचा होता. नीलकंठेश्वर, मडिवाळेश्वरांच्या रथ मिरवणुकांनी पूवर्भागात भक्तिमय वातावरण होते. चौका-चौकांत रंगावली काढून, त्याच्यावर फुलांचे मोठे हार बांधून स्वागत करण्यात आले. लेझीम, नाशिक ढोल आणि समूह नृत्यांत तरुणाई न्हाऊन निघाली. रस्त्याच्या दुतर्फा थांबलेल्या महिला व मुलांनी त्याचा आनंद घेतला.

भक्तांची मोठी गर्दी
श्री मद्विरशैव कुरुहिनशेट्टी ज्ञाती संस्थेच्या वतीने साखर पेठेतील मंदिरापासून नीलकंठेश्वर मल्लिकार्जुन उत्सवमूर्तीची रथातून मिरवणूक काढण्यात आली. तत्पूर्वी पहाटे मानकरी चंद्रशेखर मुटकिरी यांच्या हस्ते रूद्रपूजा आणि महापूजा झाली. दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी होती. दुपारी सव्वाबाराच्या सुमारास मिरवणुकीस सुरुवात झाली. चांदीच्या रथात, चांदीची उत्सवमूर्ती ठेवण्यात आली. त्याची आरती उद्योगपती शंकरराव बंदगी यांच्या हस्ते झाली.

मिरवणुकीचा मार्ग
साखर पेठ, कन्ना चौक, जोडभावी पेठ, घोंगडे वस्ती, चाटला चौक, कुंभार वेस, समाचार चौक, विजापूर वेस, भारतीय चौक, जेलरोड, जमखंडी पूल, राजेंद्र चौकापासून पुन्हा साखर पेठ असा मिरवणुकीचा मार्ग होता. रात्री दहाला भक्तिभावात त्याची सांगता झाली. मिरवणुकीच्या यशस्वीतेसाठी समाजातील ज्येष्ठ व्यापारी विजयकुमार द्यावरकोंडा, ‘ज्ञाती’चे अध्यक्ष राजू कामूर्ती, उद्योजक दीनानाथ आणि हिरालाल धुळम, र्शीनिवास मिठ्ठा, शिवदत्त कुनी, सचिव दत्तात्नय बटगिरी, तानाजी द्यावरकोंडा, रामप्पा मादगुंडी, संतोष द्यावरकोंडा, सुधाकर द्यावरकोंडा, नीलकंठेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरविंद अच्युगटला, सचिव अनिल धुळम आदींनी पर्शिम घेतले.

मडिवाळ माचदेवांची मिरवणूक जल्लोषात; लेझीम, समूहनृत्याने वेधून घेतले लक्ष
परीट समाज कुलदैवत मडिवाळेश्वर माचदेवांची रथातून मिरवणूक काढण्यात आली. कन्ना चौकातील मंदिरातून दुपारी साडेतीनला त्यास सुरुवात झाली. महापौर अलका राठोड यांनी आरती केली. तत्पूर्वी सकाळी मंदिरातील महापूजा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या हस्ते झाली. समाजाचे अध्यक्ष अर्जुन कानकुर्ती यांच्या हस्ते रूद्रपूजा करण्यात आली. कन्ना चौकपासून निघालेली मिरवणूक समाचार चौक, राजेंद्र चौकमार्गे पुन्हा कन्ना चौकात विसर्जित झाली. यात र्शद्धा गणपती मंडळाच्या लेझीम संघाने सहभाग घेतला. इंद्रा डान्स ग्रुपच्या युवकांनी समूह नृत्य सादर केले. तेलंगी पाच्छा पेठेत मोठय़ा उत्साहाने या रथाचे स्वागत करण्यात आले. समाजाचे विश्वस्त देविदास कुडगुंटे, मधुकर चिनकेरी, लिंगप्पा हंद्रोळ, अरविंद बापट, नागनाथ बापट, विठ्ठल कंदलगी, अनिल कंदलगी, अप्पा कुडगुंटे, बाबू दिवटे, बालाजी बदलापुरे, श्याम नरोळे, राजू चौधरी, सुरेश चौधरी, विजय व्हनगुंटे, सुभाष कण्णीकर आदी सहभागी झाले होते.

युवकांचा सहभाग मोठा
मद्विरशैव ज्ञाती संस्थेने यंदा रथोत्सवाची सर्व जबाबदारी युवकांवर सोपवली. त्यामुळे मिरवणुकीत युवकांचा मोठा सहभाग होता. रथोत्सव समितीचे प्रेसिडेंट र्शीनिवास बंदगी, अध्यक्ष राजू अच्युगटला, महेश बटगिरी, सचिव नंदकुमार मुटकिरी, जगन्नाथ धुळम, हणमंतू मिठ्ठा आदींनी ही जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल विश्वस्त मंडळाने त्यांचे कौतुक केले.

वीरशैव संप्रदायातील संत
मडिवाळेश्वर बाराव्या शतकातील वीरशैव संप्रदायातील संत. मडिवाळेश्वरांनी मंटपात येणार्‍या शरणांचे कपडे धुण्याचे काम सुरू केले. ‘कायकवे कैलास’ हा महात्मा बसवेश्वरांच्या वचनांप्रमाणे मडिवाळेश्वरांनीही तीन कोटी 300 वचने लिहिली आहेत, अशी माहिती मंदिराचे पुजारी ओम नम: शिवाय स्वामी यांनी दिली.