आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढोबळेंवरील गुन्हा मागे घेण्याची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - माजीमंत्री आमदार लक्ष्मण ढोबळे यांच्यावरील गुन्हा मागे घ्या आणि संबंधित पोलिस अधिकारी महिलेवर त्वरित कारवाई करा, अशी मागणी भारतीय दलित महासंघाने केली आहे. संबंधित महिलेने सूडबुद्धीने गुन्हा दाखल केल्याचे सांगत महासंघाने रविवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढला होता. जिल्हाध्यक्ष विकास कसबे यांनी नेतृत्व केले.
भारतीय दलित महासंघाच्या वतीने एसटी स्थानक, नवी पेठ, चार हुतात्मा पुतळा, आंबेडकर पुतळामार्गे जिल्हािधकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. संबंधित महिलेविरुद्ध भ्रष्टाचार प्रकरणात कारवाई केल्यानेच ढोबळे यांची बदनामी करण्यासाठी कुटील हेतूने हा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सीआयडीमार्फत चौकशी करावी. ढोबळे यांची बदनामी करणाऱ्या महिलेवर कारवाई करावी अशी मागणी कसबे यांनी केली.