आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Laxman Mane Refuses All The Allegations Against Him

माझ्यावरच ‘बलात्कार’ झालाय : लक्ष्मण माने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा- आश्रमशाळेतील महिला कर्मचा-यांचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी अटक केल्यानंतर ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांनी मात्र सोमवारी सर्व आरोपांचे खंडन केले. ‘माझ्यावर कमरेखाली वार करणा-यांवर अशीच वेळ आणणार असून अ‍ॅड. पल्लवी रेणके, हरी नरके, शिवाजी भोसले तसेच आश्रमशाळेचा कर्मचारी देशमुख यानेच हा कट रचल्याचा आरोप माने याने केला आहे. ‘खरं तर माझ्यावरच ‘बलात्कार’ झालाय,’ अशी प्रतिक्रियाही त्याने दिली.

‘मी फरार नव्हतोच. माझे वकील न्यायालयात बाजू मांडत होते. मी जामीन मिळवण्याच्या खटपटीत होतो. माझ्याविरुद्ध कट रचला आहे. माझ्याशी संघर्ष करायचा आहे तर समोर येऊन करायला पाहिजे होता. बायकांना समोर घेऊन हा प्रकार केला आहे. हा कमरेखालचा वार आहे. या मंडळींना याच प्रकारे मी उत्तर देईन. मी तुरुंगात चाललो याचा अर्थ कायम तिथेच राहणार नाही, मी माघारी आल्यावर काय करायचे ते करेनच, असा धमकीवजा इशाराही मानेने दिला. माझी न्युरो सर्जरी 2003 रोजी डॉ. भणगे यांनी केली आहे. त्यांना विचारा मी बलात्कार करण्याच्या लायकीचा तरी उरलो आहे का ? उलट माझ्याविरुद्ध कट करणा-या मंडळींनी ज्यांनी तक्रार दिली आहे त्या महिलांना एका खोलीत कोंडून ठेवले आहे, असा आरोपही त्याने केला.