आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LBT Collection Not On Toll Plaza Municipal Corporation Commissioner

एलबीटीची वसुली नाक्यांवरून नाही; महानगरपालिका आयुक्तांची माहिती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - स्थानिक संस्था कराची (एलबीटी) वसुली जकात नाक्यांवर करू नये, अशा सूचना महापालिका आयुक्त अजय सावरीकर यांनी दिल्या आहेत. कराची वसुली मागील वर्षाच्या तुलनेने दोन कोटी रुपयांनी कमी झाली आहे. त्यामुळे महापालिका कर्मचार्‍यांचे मे महिन्याचे वेतन उशिरा होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नाक्यावर एलबीटी वसुली करू नये अशी संकल्पना आहे. तेथे होणारी वसुली बंद करण्यास सांगण्यात आले. व्यापार्‍यांकडून धनादेश नाक्यावर घेण्यात येत असल्याची तक्रारी आहेत. व्यापार्‍यांनी स्वत:हून भरावे किंवा कर्मचार्‍यांनी दुकानात जाऊन एलबीटी वसूल करा, असे सांगण्यात आले आहे. मागील वर्षी मे महिन्याअखेर नऊ कोटी रुपयांची कर वसुली होती. यंदा दोन कोटींनी घट होत सात कोटीच वसुली झाली आहे. त्यामुळे महापालिका कर्मचार्‍यांचे वेतन देण्यात अडचणी आल्या आहेत. जून महिन्यात अदा करण्यात येणारे वेतन उशिराने होणार आहे. प्राधान्याने चतुर्थ आणि तृतीय र्शेणी कर्मचार्‍यांना वेतन देण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.


मक्तेदारांची देणी दिली
एलबीटीपोटी राज्य सरकारकडून पाच कोटी रुपये अनुदान मिळाले आहेत. त्यापैकी साडेतीन कोटी रुपये मक्तेदारांची देणी दिली आहेत. त्या 2011-12 ची देणी होती.


बैठकीची मिस्त्रींची सूचना
एलबीटी वसूल होत नसेल तर शहरात विकासकामे कशी होणार. त्यामुळे सर्व पदाधिका-यांनी अधिका-यांची बैठक बोलवून मार्ग काढण्याची विनंती नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी महापौर अलका राठोड यांच्याकडे केली आहे.