आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एलबीटी तिढा सुटला; दोन्ही व्यापारी संघटना राजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - स्थानिक संस्था कर (एलबीटी) भरण्यास दोन्ही व्यापारी संघटना राजी झाल्या आहेत. नागरिकांकडून व्यापार्‍यांनी 175 कोटी रुपये घेतलेले आहेत. ती रक्कम भरावी. ही रक्कम शहर विकासासाठी वापरण्यात येईल, असे आवाहन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी केले.

व्यापार्‍यांसमवेत शुक्रवारी महापालिकेत बैठक झाली. तीत गुडेवार यांनी केलेल्या आवाहनाचा अनुकूल परिणाम दिसून आला. रक्कम भरल्याचा परिणाम तुम्हाला दिसेलच. तुमचा लढा शासनाशी आहे, महापालिकेशी नाही. महापालिका व्यापार्‍यांना पूर्ण सहकार्य करेल. कर्मचारी व्यापार्‍यांना त्रास देणार नाहीत, असे आश्वासन गुडेवार यांनी दिले. कर चुकवणार्‍या व्यापार्‍यांना त्यांनी तंबीही दिली. गरज पडली तर कारवाई करण्यास मागे पुढे पाहणार नाही, असेही संकेत दिले.


विकास कर भरणार
‘एलबीटी’ विरोधात लढा कायम असून, आम्ही न्यायालयात आहोत. ‘एलबीटी’ऐवजी आम्ही विकास कर भरणार आहोत. 54 व्यापार्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत, ते मागे घ्यावेत. शहराच्या विकासासाठी कर भरा, असे आवाहन आम्ही व्यापार्‍यांना करत आहे.’’ प्रभाकर वनकुद्रे, अध्यक्ष, व्यापारी महासंघ


आधी पैसे भरा
महापालिका तुमचे घर आहे. घरातले पैसे अगोदर भरा. विकासासाठी शासकीय अनुदानात महापालिकेचा हिस्सा आवश्यक आहे. न्यायालयाचा निकाल लागेल त्या दिवसापासून त्याची अंमलबजावणी होईल.’’ चंद्रकांत गुडेवार, आयुक्त, महापालिका


व्यापारी सशर्त राजी
व्यापारी कर भरण्यास तयार असल्याचे दोन्ही व्यापारी संघटनांनी सांगितले. नाक्यावर गाडी अडवू नये, व्यापारी एलबीटी भरलेला असताना पुन्हा नोटीस देण्याचा प्रकार, शासनाच्या नियमानुसार व्यापार्‍यांची समिती नेमणे आदींवर चर्चा झाली.